मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uma Shanti: प्रसिद्ध गायिकेकडून तिरंग्याचा अपमान; देशात संतापाची लाट उसळल्यानंतर मागितली माफी

Uma Shanti: प्रसिद्ध गायिकेकडून तिरंग्याचा अपमान; देशात संतापाची लाट उसळल्यानंतर मागितली माफी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Aug 17, 2023 06:07 PM IST

Uma Shanti Apologised: तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी युक्रेनची प्रसिद्ध गायिका उमा शांतीने माफी मागितली आहे.

Uma Shanti
Uma Shanti

Uma Shanti Insulting Tricolour: युक्रेनची प्रसिद्ध गायिका उमा शांतीने पुण्यातील एका संगीत कार्यक्रमादरम्यान तिरंग्याचा अपमान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी उमा शांतीविरोधात पुण्यातील मुंढवा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. नुकताच उमा शांतीने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत भारतीयांची माफी मागितली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उमा शांतीने दोन्ही हातात तिरंगा घेऊन नृत्य करताना दिसत आहे. यानंतर तिने तिरंगा प्रेक्षकांच्या दिशेने फेकला. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखा व्हायरल झाला. उमा शांतीने भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला. यानंतर मुंढवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी उमा शांतीने भारतीयांची माफी मागितली आहे. पुण्यातील कार्यक्रमात भारताच्या स्वातंत्र्यासाठी माझा पाठिंबा व्यक्त करण्याचा माझा हेतू होता. परंतु, माझ्याकडून नकळत चूक घडली. याबाबत मी सर्व भारतीयांची माफी मागते. माझे भारतावर प्रेम आहे आणि मला स्वातंत्र्याचे महत्त्व माहिती आहे. माझे भारतीयाला दुखवायचा कोणताही हेतू नव्हता, असे उमा शांतीने म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग