मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gadchiroli : सहा लाखांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; गडचिरोली पोलिसांचं मोठं यश

Gadchiroli : सहा लाखांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; गडचिरोली पोलिसांचं मोठं यश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 04:08 PM IST

Gadchiroli News : ज्या दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्पण केलं आहे, त्यांच्यावर पोलिसांनी सहा लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.

Two Naxalists Surrender In Gadchiroli
Two Naxalists Surrender In Gadchiroli (HT)

Two Naxalists Surrender In Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यामुळं आता माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावं, यासाठी गडचिरोली पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते, त्यानंतर अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. अनिल कुजूर (वय २६) आणि रोशनी पल्लो (वय ३०) असं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते नक्षली कारवायांना कंटाळलेले होते. त्यानंतर आता त्यांनी सामान्य लोकांमध्ये राहून निर्भयपणे जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुजूर हा २००९ साली नक्षलवादी गटांत सामील झाला होता. खोबरमेंढामध्ये झालेल्या चकमकीत त्यानं सीआरपीएफच्या जवानावर गोळीबार केला होता. आत्मसमर्पण केल्यानंतर अनिल कुजूर म्हणाला की, सरकारकडून या भागात अनेक विकासकामं सुरू आहेत. हे वास्तव नक्षलवादी स्विकारण्यास तयार नाहीत. आपल्या लक्ष्यासाठी नक्षलवादी या भागातील गरिब आदिवासींचा वापर करत आहेत. माओवाद्यांच्या या कारवायांमध्ये विवाहित पुरुषाला त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगता येत नाही, नक्षलवादी चळवळीसाठी गोळा केलेला पैसा अनेक नक्षलवादी त्यांच्या खासगी कामासाठी वापरत असल्याचं त्यानं पोलिसांसमोर सांगितलं.

नक्षलवाद्यांनी केलेल्या आत्मसमर्पणाबाबत बोलताना गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, नक्षलवादी कुजूर आणि महिला नक्षलवादी रोशनी हे दोघे २००९ साली माओवादी कारवायांत सहभागी झाले होते. रोशनीला माओवाद्यांनी डेप्युटी कमांडर हे पद दिलं होतं. २०१५ मध्ये रोशनीनं इरापनेरमध्ये तीन लोकांची हत्या केली होती. अनिल हा एटापल्लीताला रहिवासी असून रोशनी छत्तीसगडच्या नारायणपूरमधील रहिवासी आहे.

IPL_Entry_Point

विभाग