मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aditya Thackeray : प्रकल्प राज्यात आणि इंजिनियर्स चेन्नईचे; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

Aditya Thackeray : प्रकल्प राज्यात आणि इंजिनियर्स चेन्नईचे; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 03:39 PM IST

Versova Bandra Sea Link : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नांना खोके सरकारनं उत्तर द्यावं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे.

Aditya Thackeray vs Eknath Shinde
Aditya Thackeray vs Eknath Shinde (HT)

Aditya Thackeray vs Eknath Shinde : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वर्सोवा बांद्रा सी लिंक प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्कड्रग प्रकल्प राज्याबाहेर जाणं हा वेगळा विषय आहे, परंतु सध्या राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत, त्यासाठी लागणारे इंजिनियर्स बाहेरच्या राज्यांतून मागवले जात असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे. त्यामुळं आता पुन्हा शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम आता बंद पाडण्यात आलं आहे, या कामासाठी लागणाऱ्या अभियंत्यांसाठी तामिळनाडूतल्या चेन्नईत जाहिरात देण्यात आली आहे. राज्यातल्या तरुण-तरुणींमध्ये स्कील असतानाही नोकरीची जाहिरात दुसऱ्या राज्यात कशी देण्यात आली?, शिंदे सरकार राज्यातील भूमिपुत्रांचं नुकसान करत असल्याची टीका करत यावर उत्तर देण्याचं आव्हान दिलं आहे.

एखाद्या गोष्टीचं स्कील महाराष्ट्रातील लोकांकडे नसेल तर त्याला राज्यातूनच काय परदेशातूनही मागवलं तर हरकत नाही, परंतु एका ठराविक शहरातच नोकरीची जाहिरात का देण्यात आली?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मी शिंदे सरकारला वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्कड्रग प्रकल्पावर शिंदे-फडणवीस सरकारला प्रश्न विचारले होते, त्यावर अजूनही सरकारकडून उत्तर आलेलं नाही. मुख्यमंत्री आज बाराव्यांदा दिल्लीत गेले आहेत. हे सरकार आल्यापासून केवळ प्रकल्पांना स्थगिती देत असून आता वर्सोवा ब्रांदा सी लिंकचं कामही बंद पाडण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.

IPL_Entry_Point