मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Elephant in Hospital: चक्क रुग्णालयात घुसून हत्तींनी घातला धुमाकूळ; रुग्णांची धावपळ, डॉक्टर चक्रावले

Elephant in Hospital: चक्क रुग्णालयात घुसून हत्तींनी घातला धुमाकूळ; रुग्णांची धावपळ, डॉक्टर चक्रावले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 06, 2022 12:19 PM IST

Elephant in Hospital : जंगलात नेहमी दिसणारा हत्ती थेट रुग्णालयात घुसल्याचं पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

viral news today in marathi
viral news today in marathi (HT)

viral news today in marathi : सोशल मीडियावर अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसल्याचं व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. त्यातल्या काही व्हायरल घटना मजेशीर असतात तर काही धक्कादायक असतात. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमधील एका रुग्णालयात घडला आहे. कारण दोन हत्तींनी थेट रुग्णालयातील वार्डमध्ये घुसून धुमाकूळ धातल्यानं डॉक्टर्स आणि नर्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे. रुग्णालयात उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचे फोटो काढून करून त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्यामुळं आता अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकं काय झालं?

बंगालमधील जलपाईगुडीच्या एका रुग्णालयात चक्क दोन हत्ती घुसले. त्यामुळं रुग्णालयात एकच खळबळ उडाली. व्हायरल होत असलेल्या फोटोंनुसार, एक हत्ती रुग्णालयातील वार्डमध्ये घुसला असून दुसरा दरवाजालगत उभा आहे. रुग्णालयात हत्ती आल्याचं पाहून अनेक लोकांनी तिथून पळ काढला.

काही लोकांनी त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु हत्ती काही जागचे हलतच नव्हते. त्यामुळं काही दुर्घटना होऊ नये म्हणून रुग्णालयाच्या ज्या वार्डमध्ये हत्ती घुसले त्या वार्डातल्या रुग्णांना रुग्णालय प्रशासनानं इतरत्र हलवलं.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस...

युजर सुसंता नंदा यांनी या घटनेचे काही फोटोज ट्विटरवर शेयर केले आहेत. त्यात हत्ती रुग्णालयात फिरताना दिसत आहेत. थेट रुग्णालयात हत्ती घुसल्याचा फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर एका युजर्सनं लिहिलंय की, 'हत्ती त्यांचा उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले आहेत', तर दुसऱ्यानं आपण त्यांचं जंगल नष्ट करत असल्यानं ते आता आपल्या घरांमध्ये घुसत असल्याचं म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग