मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Crime : महिलेची हत्या झाल्यानंतर संशयित आरोपीची आत्महत्या; लागोपाठ दोन घटनांनी गुजरात हादरलं

Gujarat Crime : महिलेची हत्या झाल्यानंतर संशयित आरोपीची आत्महत्या; लागोपाठ दोन घटनांनी गुजरात हादरलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 14, 2023 03:32 PM IST

Kanchan Murder Case : संशयित आरोपीनं कारमध्ये स्वत:वरच धारदार शस्त्रानं वार करत आत्महत्या केल्याचं तपासातून समोर आलं आहे.

Kanchan Murder Case Gujarat
Kanchan Murder Case Gujarat (HT_PRINT)

Kanchan Murder Case Gujarat : गुजरातच्या पोरबंदर शहरातील एका घरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर काही वेळातच संशयित आरोपीने स्वत:वर धारदार शस्त्रांनी वार करत आत्महत्या केली. त्यामुळं आता या घटनेतील गूढ वाढलं असून या प्रकरणातील आरोपी कोण आहे, महिलेची हत्या कशामुळं झाली आणि त्यानंतर संशयित आरोपीनं कोणत्या कारणामुळं आत्महत्या केली, या प्रश्नांचं उत्तर पोरबंदर पोलीस शोधत आहेत. कांचन असं हत्या झालेल्या महिलेचं तर त्रिकम असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या पोरबंदर शहरात राहणाऱ्या त्रिकम यांच्या घरात कांचन नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. कांचनच्या हत्येत त्रिकम याचाच हात असल्याचा संशय स्थानिकांसह पोलिसांना होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी त्रिकमच्या घरावर छापा करत प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी संशयित आरोपी त्रिकम हा कुटुंबियांसहित चोटीला येथील देवीच्या दर्शनासाठी गेला होता. कांचनच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याची त्याला कल्पना होती. त्यानंतर त्रिकमने कारगाडीमध्ये स्वत:वरच धारदार शस्त्रानं वार करत आत्महत्या केली. त्यानंतर आता महिलेची हत्या आणि त्यानंतर संशयित आरोपीने आत्महत्या केल्यामुळं पोरबंदर शहरात खळबळ उडाली आहे.

पोरबंदर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांना अद्याप घटनेचे कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. महिलेची हत्या आणि संशयित आरोपीच्या आत्महत्येचा तपास केला जाणार असल्याचं पोरबंदरच्या पोलीस उपाधीक्षक नीलम गोस्वामी यांनी सांगितलं आहे. कांचन आणि त्रिकम यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिसांकडून तपासासाठी फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली जात आहे. त्रिकम यांच्या घरात कांचन यांची हत्या कशी झाली, त्यानंतर संशयित आरोपी त्रिकम यांनी आत्महत्या का केली?, अशा अनेक प्रश्नांचा गुजरात पोलीस मागोवा घेत आहेत.

IPL_Entry_Point