मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 14 April 2023 : नवी मुंबईत रबाळे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत आग

Fire in Navi Mumbai MIDC

Live News Updates 14 April 2023 : नवी मुंबईत रबाळे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत आग

04:40 PM ISTApr 14, 2023 10:10 PM Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • Share on Facebook

Navi Mumbai: रबाळे एमआयडीसीमध्ये एका रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीत आगीची घटना. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

Fri, 14 Apr 202304:40 PM IST

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, लोहगावात नागरिकांची तारांबळ

Pune Weather Forecast News Today : पुण्यातील लोहगाव आणि येरवडा परिसरात आज संध्याकाळी पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळं पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Fri, 14 Apr 202312:27 PM IST

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४० जागा जिंकू: संजय राऊत

शरद पवार हे देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना भेटून एकत्र येण्यासाठी काम करत आहेत. त्यात आम्हीही सहभागी आहोत. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकू, असे वातावरण आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Fri, 14 Apr 202310:59 AM IST

Ramesh Bais : मुंबईतील सोसायट्या व उद्योगांचे नियमित 'फायर ऑडिट' करायला हवे - राज्यपालांचं मत

शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेनं वाढत आहे. अशा वेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसं मनुष्यबळ असलेलं व प्रशिक्षित असं आधुनिक अग्निशमन दल असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह व अग्निसेवा दिनाचं उद्घाटन बैस यांच्या हस्ते राजभवनात झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईसारख्या शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांना तसेच गृहनिर्माण संस्थांना सहभागी केले पाहिजे तसेच गृहनिर्माण संस्था व उद्योग संस्थांचे नियमित 'फायर ऑडिट' केले गेले पाहिजे, असंही ते म्हणाले.

Fri, 14 Apr 202308:11 AM IST

Sanjay Raut: महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४० जागा जिंकू, राऊतांचा दावा

शरद पवार हे देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना भेटून एकत्र येण्यासाठी काम करत आहेत. त्यात आम्हीही सहभागी आहोत. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकू, असे वातावरण आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Fri, 14 Apr 202307:16 AM IST

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: सोलापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन

सोलापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले आहे. स्पर्शरंग कला परिवाराच्या सदस्यांनी एक सेमी आकाराच्या १० हजार १३२ फोटोपासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारली. ८ बाय ८ फुटाचे पोट्रेट साकारण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागला.

Fri, 14 Apr 202308:57 AM IST

Dr. babasaheb ambedkar jayanti: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर

शिंदे-फडणवीस यांच्याकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहचले. तसेच इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला.

CM Eknath Shinde at Chaityabhumi in Dadar Mumbai
CM Eknath Shinde at Chaityabhumi in Dadar Mumbai

Fri, 14 Apr 202305:54 AM IST

Sanjay Raut: शरद पवार- राहुल गांधींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट सुरू केली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. विरोधकांनी एकत्र राहायचे नाही, असा भाजपचा दृष्टिकोन राहिला आहे. पण त्यांच्या या भ्रमाचा भंग होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण विरोधक एकत्र येतील, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय राऊतांनी दिली आहे.

Fri, 14 Apr 202305:38 AM IST

COVID-19: देशात कोरोनाचा धोका वाढतोय, २४ तासात ११ हजार रुग्णांची नोंद

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात ११ हजार १०९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या ४९ हजार ६२२ रुग्ण सक्रीय आहेत.

Fri, 14 Apr 202304:51 AM IST

Mumbai Police: दहशतवाद्यांबाबत एटीएसला खोटी माहिती दिल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईत आलेल्या तीन दहशतवाद्यांबाबत एटीएस खोटी माहिती देणाऱ्या यासीन सय्यद नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली. पुढील तपासासाठी आरोपीला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Fri, 14 Apr 202304:49 AM IST

Eknath Shinde : आनंदाचा शिधा उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद - एकनाथ शिंदे

आनंदाचा शिधा उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरं तर खूप मोठे असून हा उपक्रम राबवताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. वर्षा निवासस्थान येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Fri, 14 Apr 202304:22 AM IST

Mumbai: मुंबईतील पान दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Mumbai Police: पान दुकानांना टार्गेट करून त्या दुकानांमध्ये सिगारेट ठेवण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्या एका बनावट पोलिस अधिकाऱ्याला मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Fri, 14 Apr 202303:41 AM IST

Babasaheb Ambedkar Jayanti 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, अशा आशयाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट केले आहे.

Fri, 14 Apr 202302:30 AM IST

MNS: मनसे नेते प्रसाद घोरपडे यांचा शिंदे गटात प्रवेश

MNS: प्रसाद घोरपडे यांनी दीड महिन्यापूर्वी मनसेतील पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, पक्षाकडून कोणतीही दखल न घेतल्याने अखेर घोरपडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून घोरपडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

Fri, 14 Apr 202302:15 AM IST

Ramdas Athawale: २०२४च्या निवडणुकीपूर्वी रामदास आठवले यांचाविरोधकांना इशारा

Ramdas Athawale: २०२४ च्या निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. विरोधकांना एकत्र यायचे असेल तर ते येऊ करू शकतात. मोदींना टक्कर देणे सोपे नाही. ते एक सक्षम आणि मजबूत नेते आहेत.२०२४ मध्ये मोदीजी आणि एनडीए पुन्हा सत्तेत येतील, असे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Fri, 14 Apr 202302:12 AM IST

South Korea Accident: दक्षिण कोरियात बसला भीषण अपघात, एक ठार, ३४ जखमी

दक्षिण कोरियातील चुंगजू येथे बस अपघातात एक ठार आणि ३४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.