मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police: मुंबईतील पानटपरी चालकांना लुटणारा हाच तो बोगस पोलीस…

Mumbai Police: मुंबईतील पानटपरी चालकांना लुटणारा हाच तो बोगस पोलीस…

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 14, 2023 02:29 PM IST

Mumbai Police Arrested Fake Police: मुंबईतील पान दुकानदारांची लुट करणाऱ्या बोगस पोलीस अधिकाऱ्याला साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Fake Police
Fake Police

Mumbai Crime: मुंबईतील पानटपरी चालकांना लुटणाऱ्या बोगस पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील पान दुकानात विदेशी सिगारेट ठेवणाऱ्या दुकानदारांना कारवाई करण्याची धमकी देऊन हा बोगस पोलीस अधिकारी त्यांची लूट करायचा. मात्र, रस्त्याने जाताना वाहतूक पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता सत्य समोर आले.

ट्रेंडिंग न्यूज

कैलास खामकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पोलिसांच्या वेशात साकीनाका हद्दीतील एका पान दुकानदाराला आपल्या जाळ्यात अडकवण्याच्या तयारीत होता. मात्र, तिथून जाणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता तो बोगस पोलीस अधिकारी असल्याचे वाहतूक पोलिसाच्या लक्षात आले. आरोपीकडून बनावट पोलीस ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे, ज्याचा वापर करून तो दुकानदारांना धमकावून पैसे उकळायचा. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे, अशी माहिती मुंबईचे डीसीपी महेश्वर रेड्डी यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांची खाकी वर्दी परिधान केली होती. पण त्याची पेहरावाची पद्धत, गळ्यात रुमाल आणि पान खाऊन बोलण्याच्या पद्धतीमुळे त्याच्यावर वाहतूक पोलिसांना संशय आला. एवढेच नव्हेतर त्याच्याजवळ ट्रॉफिक पोलिसांची बाईक होती. यावरून वाहतूक पोलिसांना संशय आला. विशेष म्हणजे, आरोपी परिधान केलेल्या वर्दीवर किती तारे आहेत आणि त्याचा अर्थ काय असतो? याचीही त्याला माहिती नव्हती.

IPL_Entry_Point

विभाग