Calcutta HC On Teenage Girls: सर्वाच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका सल्ल्यावर नाराजगी व्यक्त केली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात महिलांबाबत कोलकाता उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता. या निर्णयाने उच्च न्यायालयाने म्हटले होते की, तरुण मुलींनी दोन मिनिटांच्या आनंदासाठी आपल्या सेक्स भावनेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले की, न्यायालयाने कोणत्याही प्रकरणात फैसला सुनावताना नेहमी आपली वैयक्तिक मते व उपदेश देण्यापासून परावृत्त राहिले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कोलकाता हायकोर्टाचा हा सल्ला आक्षेपार्ह आहे. त्याचबरोबर अनावश्यकही आहे. याची काहीच गरज नव्हती. अशा प्रकारचे विधान आर्टिकल २१ चे उल्लंघन आहे, जे मूलभूत अधिकारांसंबंधित आहे. आर्टिकल २१ व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार व वैयक्तिक स्वतंत्र्याचा अधिकार प्रदान करते.
या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एडव्होकेट माधवी दीवान यांना एमिकस क्यूरी बनवले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला सवाल केला आहे की, ते या निर्णयाविरोधात अपील करणार आहेत का? सरकारकडून उत्तर घेऊन याची माहिती वकील कोर्टाला देणार आहेत.
कोलकाता उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या खटल्यात फैसला सुनावला होता. यावेळी कोर्टाने म्हटले होते की, तरुण मुलींनी सेक्सच्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. दोन मिनिटांच्या आनंदाकडे लक्ष देऊ नये. कोर्टाने मुलांनाही सल्ला दिला होता की, त्यांनी मुलींचा सन्मान करावा. उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर आरोपीविरुद्धचा पॉक्सो कायदा हटवून त्याला मुक्त केले होते. कारण अल्पवयीन मुलीने साक्ष दिली होती की, शारीरिक संबंध बनवण्यात तिचीही इच्छा होती.
संबंधित बातम्या