मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : किस करताना सापानं सर्पमित्राच्या ओठांना घेतला चावा; पाहा थरारक व्हिडिओ

Viral Video : किस करताना सापानं सर्पमित्राच्या ओठांना घेतला चावा; पाहा थरारक व्हिडिओ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 09:29 AM IST

Karnataka Viral Video : सापासोबत स्टंटबाजी करणं आणि सापाला उचलून त्याला किस करणं हे तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण चुंबन घेताच सापानं युवकांला दंश केला आहे. पाहा व्हिडिओ.

Karnataka Viral Video
Karnataka Viral Video (HT)

Karnataka Viral Video : विषारी साप पकडल्यानंतर त्याच्यासोबत स्टंटबाजी करणं एका सर्पमित्राला चांगलंच महागात पडलं आहे. कारण चिडलेल्या सापानं सर्पमित्राच्या ओठांवरच दंश केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. त्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्पमित्र असलेला अलेक्स हा गेल्या अनेक वर्षांपासून साप पकडून त्यांना जंगलात सोडण्याचं काम करत आहे. शिवमोगातील बोम्मनकट्टे गावात एक साप आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर अलेक्स त्याच्या मित्रासह घटनास्थळी दाखल झाला. त्यानं साप पकडल्यानंतर त्याला किस करण्याचा प्रयत्न केला. परंतु असं करणं सापाला काही आवडलं नाही. त्यानं अलेक्सच्या ओठांवर जोराचा चावा घेतला. त्यानंतर सर्पमित्र अलेक्सला तात्काळ शिवमोगातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अलेक्सला कशा प्रकारे साप चावतोय, हे स्पष्ट दिसत आहे. त्याला साप चावल्यानंतर तो सापाला सोडून बाजूला पडतो. त्याचे मित्रही सापाला जंगलात जाऊ देतात. त्यानंतर अलेक्सला त्याच्या मित्रांनी तातडीनं रुग्णाललयात दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point