मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sand Mafia : पोलीस आणि वाळू तस्करांमध्ये धुमश्चक्री; गोळीबारात एकाचा मृत्यू, पाच कर्मचारी जखमी

Sand Mafia : पोलीस आणि वाळू तस्करांमध्ये धुमश्चक्री; गोळीबारात एकाचा मृत्यू, पाच कर्मचारी जखमी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 13, 2022 09:59 AM IST

Mining Mafia Firing : कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवरच वाळू माफियांनी बेछूट गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही वाळू तस्करांना प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एकाचा मृत्यू झाला आहे.

Mining Mafia Firing In Uttarakhand
Mining Mafia Firing In Uttarakhand (HT_PRINT)

Mining Mafia Firing In Uttarakhand : ग्रामीण भागासह शहरातील अनेक नद्यांमधून वाळूची तस्करी करणाऱ्या माफियांची दहशत असते. अनेकदा माफिया वाळूची तस्करी करत असताना पोलीस कारवाईच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. याशिवाय अनेकवेळा वाळू तस्कर कारवाईसाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याच्याही घटना घडलेल्या आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तराखंडमधील उधमसिंहनगरमध्ये घडला आहे. नदीत वाळूची तस्करी होत असताना कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवरच माफियांनी गोळीबार सुरू केल्यानं झालेल्या धुमश्चक्रीत एक तस्कर ठार झाला असून पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळं आता या घटनेनंतर उत्तराखंडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील उधमपूरनगरमधील एका नदीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह कारवाईसाठी नदीच्या दिशेनं धाव घेतली. परंतु पोलीस आल्याचा सुगावा लागताच वाळू माफियांनी त्यांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनीही वाळू माफियांना जशास तसं उत्तर दिलं. या चकमकीत एका वाळू माफियाचा मृत्यू झाला असून पाच पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दोन पोलीस अजूनही बेपत्ता...

वाळू माफिया आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर दोन पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. वाळू माफियांनी त्यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणामुळं उत्तराखंडमध्ये चांगलंच वातावरण तापलेलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू माफिया आणि पोलिसांत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर कुंडा पोलीस ठाण्यासमोर जवळपास ४०० ते ५०० लोकांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. आंदोलकांनी पोलिसांवर हत्येचा आरोप केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग