मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gehlot vs Pilot : सरकार पाडण्यासाठी पायलटांनी शहांची घेतली होती भेट; अशोक गेहलोतांचा नवा आरोप

Gehlot vs Pilot : सरकार पाडण्यासाठी पायलटांनी शहांची घेतली होती भेट; अशोक गेहलोतांचा नवा आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 11:42 AM IST

Gehlot vs Pilot In Rajasthan : राजस्थानातील कॉंग्रेसचं सरकार पाडण्यासाठी सचिन पायलट यांनी काही आमदारांसह गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती, असा खळबळजनक आरोप गेहलोतांनी पायलटांवर केला आहे.

Gehlot vs Pilot In Rajasthan
Gehlot vs Pilot In Rajasthan (HT)

Gehlot vs Pilot In Rajasthan : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही अजून राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्षाचा तिढा संपलेला नाही. कारण आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेस नेते सचिन पायलटांवर सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशोक गेहलोतांनी सचिन पायलटाशी असलेल्या मतभेदांवर पहिल्यांदाच भाष्य केल्यानं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानातील कॉंग्रेसचं सरकार पाडण्यासाठी सचिन पायलटांनी काही आमदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली होती. त्या बैठकीत शहा यांच्यासह धर्मेंद्र प्रधान आणि जफर इस्लाम हे दोन नेतेही उपस्थित होते, असा खळबळजनक दावा करत गेहलोतांनी पायलटांवर निशाणा साधला आहे.

गृहमंत्री शहा हे आमच्या आमदारांना पेढे भरवताना आणखी थोडी वाट पाहण्यास सांगत होते. परंतु आता सत्याचा विजय झाला असून आमचं सरकार पडलेलं नाही. माझं सरकार वाचवणाऱ्या १०२ आमदारांना मी कसं विसरू शकतो?, त्यामुळं थोड्याशा आमदारांनी अशी कृती केली असेल तर त्याचं मला वाईट वाटत नाही, असं म्हणत त्यांनी पायलटांना टोला लगावला आहे.

सरकारमधून बाहेर पडण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आली होती. परंतु त्यावेळी अनेक आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असं म्हणत सध्या सरकारला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं आहे.

IPL_Entry_Point