मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : मातोश्रीवर दरमहिन्याला शंभर कोटी जायचे; शिंदे गटाच्या खासदाराचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Shiv Sena : मातोश्रीवर दरमहिन्याला शंभर कोटी जायचे; शिंदे गटाच्या खासदाराचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 11:15 AM IST

Shiv Sena vs Shinde Group : शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यामुळं आता शिवसेना आणि शिंदे गटातला संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Shiv Sena vs Shinde Group
Shiv Sena vs Shinde Group (HT)

Shiv Sena vs Shinde Group : शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपकडून शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रत्येकी पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगलेल्या असतानाच आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांनी थेट उद्धव ठाकरेंवर आणि मातोश्रीवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे हे मातोश्रीवर दरमहिन्याला शंभर कोटींचे खोके घेऊन जात होते, असा खळबळजनक आरोप प्रतापराव जाधवांनी ठाकरेंवर केल्यानं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

राज्यात पालकमंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे पहिल्यांदाच बुलढाण्यात आले होते. त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव समर्थकांनी मेहकरमध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यावेळी बोलताना प्रतापराव जाधवांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव ठाकरे सत्तेत असताना शंभर खोके एकदम ओके अशा पद्धतीनं मातोश्रीवर सचिन वाझे दरमहिन्याला पैसे जमा करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं आता शिंदे गटानं ठाकरेंवर केलेल्या या आरोपांमुळं नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आता दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. शिवसेनेला दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली असून शिंदे गट बीकेसीवर दसरा मेळावा घेणार आहे. त्याआधी शिंदे गटानं मेळाव्याचे दोन टीझर जारी केले असून शिवसेनेनंही एक टीझर जारी केला आहे.

IPL_Entry_Point