Chandani Chowk Bridge Pune : वाहतूक कोंडीसाठी कारण ठरत असलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल मध्यरात्री एक वाजता पाडण्यात आला आहे. यासाठी ६०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. परंतु तरीही पूल पूर्णपणे पडलेला नव्हता. त्यानंतर जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं पुलाला जमिनदोस्त करण्यात आलं. सकाळपर्यंत पुलाचा राडारोडा उचलण्याचं काम सुरू होतं.