राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्ड म्हणजेच आरएसएमएसएसबी येथे कनिष्ठ सहाय्यक आणि लिपिक पदांच्या ४ हजारांहून अधिक जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार येत्या २० फेब्रुवारीपासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. या पदासाठी उमेदवार rsmssb.rajasthan.gov.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरतीअंतर्गत एकूण ४ हजार १९७ कनिष्ठ सहाय्यक आणि लिपिक पदे भरली जाणार आहे. त्यापैकी ग्रेड १ साठी- ५८४, ग्रेड- २ साठी ६१ आणि ३ हजार ५५२ जागा कनिष्ठ सहाय्यक पदाच्या भरल्या जातील. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
अर्जदारांचे वय ०१ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ४० दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क:
सामान्य प्रवर्ग, बीसी (क्रीमी लेयर) आणि ईबीसी (क्रीमी लेयर) उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागेल; बीसी (नॉन-क्रीमी लेयर), ईबीसी (नॉन-क्रीमी लेयर), ईडब्ल्यूएस, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून वरिष्ठ माध्यमिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा किंवा डीओईएसीसी द्वारे आयोजित उच्च स्तरीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा संगणक संकल्पना किंवा सीओपीए / डेटा तयारी आणि संगणक सॉफ्टवेअर (डीपीसीएस) प्रमाणपत्र किंवा संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोगातील पदवी / डिप्लोमा / प्रमाणपत्र किंवा संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोगासह वरिष्ठ माध्यमिक प्रमाणपत्र किंवा पॉलिटेक्निक संस्थेतून विज्ञान आणि अभियांत्रिकी संगणकातील डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.