मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : दिल्लीत न्यायालय परिसरात महिला व पुरुष वकीलामध्ये फ्री-स्टाइल हाणामारी

Viral Video : दिल्लीत न्यायालय परिसरात महिला व पुरुष वकीलामध्ये फ्री-स्टाइल हाणामारी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 20, 2023 11:45 PM IST

Female and male advocates fighting :एक महिला वकील आणि एक पुरूष वकील एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे.

Viral Video
Viral Video

Rohini Court Delhi : सोशल मीडियावर सध्या एक महिला व एका पुरुष वकीलामध्ये लाथा-बुक्क्यांनी जोरदार हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील रोहिणी कार्टातील असल्याचे बोलले जात आहे. कोर्टाच्या परिसरात दोन वकिलांमध्ये जोरदार भांडण झाले व दोघांनी एकमेकांनी मारायला सुरुवात केली.

ट्रेंडिंग न्यूज

एक महिला वकील आणि एक पुरूष वकील एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून याची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला वकिलाने पुरूष वकिलाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महिला वकिलाने पुरूष वकिलावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या व्हायरल व्हिडिओतील मारामारी करणाऱ्या पुरूष वकिलाचेनाव विष्णू कुमार शर्मा असल्याचं सांगितलं जात आहेत. महिला वकिलाने विष्णू कुमार यांच्यावर छळ करणे, शारीरिक हिंसा आणि धमकावणे अशा प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. ही घटना गुरूवार, १८ मे रोजीची असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून दोषीवर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग