मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Project Cheetah : नामिबियाहून भारतात ८ चित्ते घेऊन येणाऱ्या विमानात अशी होती व्यवस्था , पाहा VIDEO

Project Cheetah : नामिबियाहून भारतात ८ चित्ते घेऊन येणाऱ्या विमानात अशी होती व्यवस्था , पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 17, 2022 11:55 PM IST

नामिबियाहून भारतात चित्ते (Project Cheetah) घेऊन येणाऱ्या विमानाच्या आतील दृष्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हा अंदाज बाधू शकता की, या आफ्रिकी चित्त्यांना भारतात आणण्यासाठी किती चोख व्यवस्था केली आहे.

विमानाच्या आतील दृष्याचा व्हिडिओ
विमानाच्या आतील दृष्याचा व्हिडिओ

नामिबिया देशातून ८ चित्ते (Project Cheetah) शनिवारी भारतात दाखल झाले. भारतात ही प्रजाती लुप्त झाल्यानंतर सात दशकाने चित्ते भारतात आणले गेले आहे. बोईंगच्या एका विशेष विमानाने शुक्रवारी रात्री आफ्रिकी देशातून उड्डाण केले होते. लाकडापासून बनवलेल्या पिंजऱ्यात चित्त्यांना घेऊन जवळपास १० तासांचा प्रवास करून विमान शनिवारी भारतात दाखल झाले. चित्त्यांना (Cheetah) आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

विमान सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ग्वाल्हेर विमानतळावर उतरले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांना मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले.

ज्या विमानातून या चित्त्यांना नामिबियाहून भारतात आणले ते विमान बोइंग ७४७-४०० मालवाहू विमान होते. विमान नामिबिया पोहचल्यानंतर त्याचे फोटो समोर आले होते. विमानाच्या पुढच्या बाजुला चित्त्याचे चित्र रंगवले होते. आता विमानाच्या आतील दृष्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हा अंदाज बाधू शकता की, या आफ्रिकी चित्त्यांना भारतात आणण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने विमानाच्या आतला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये दिसून येते की, पिंजऱ्यात बंद या चित्त्यांना भारतात आणण्यासाठी किती चोख व्यवस्था करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये दिसते की, चार-चार पिंजऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगितले जाते की, हा व्हिडिओ विमान ग्वाल्हेर विमानतळावर लँडिंग होण्याच्या थोड्या वेळापूर्वीचा असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या