मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बायकोनं घरात ‘सळो की पळो’ करून सोडलंय, साहेब होळीसाठी सुट्टी द्या; पीएसआयचं थेट एसपींना पत्र

बायकोनं घरात ‘सळो की पळो’ करून सोडलंय, साहेब होळीसाठी सुट्टी द्या; पीएसआयचं थेट एसपींना पत्र

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 08, 2023 03:53 PM IST

Muzaffarnagar Viral News : २२ वर्षांपासून होळीला सासरी गेलेलो नाही, पत्नी रागावल्यामुळं पीएसआयनं थेट एसपींना पत्र लिहून सुट्टीची मागणी केल्याचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral News Muzaffarnagar Uttar Pradesh
Viral News Muzaffarnagar Uttar Pradesh (HT)

Viral News Muzaffarnagar Uttar Pradesh : सणासुदीच्या काळात पोलिसांना अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी जावं लागतं. परिणामी कुटुंबासोबत कोणताही सण पोलिसांना आनंदानं साजरा करता येत नाही. त्यामुळं अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात कलह देखील निर्माण होत असतात. परंतु आता होळीसाठी सुट्टी न मिळाल्यानंतर बायकोनं झापल्यानंतर पीएसआय नवऱ्यानं थेट पोलीस अधिक्षकांनाच सुट्टीसाठी अर्ज केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील अशोक कुमार नावाच्या पोलीस निरिक्षकानं बायकोशी वाद टाळण्यासाठी थेट १० दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केला आहे. अशोक कुमार यांचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुमार हे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक आहेत. सणासुदीच्या काळात पोलीस बंदोबस्तासाठी हजर रहावं लागत असल्यामुळं गेल्या २२ वर्षात ते पत्नीसह एकदाही होळीसाठी सासरी गेलेले नाहीत. त्यामुळं त्यांची बायको त्यांच्यावर चांगलीच भडकली. घरात वाद वाढल्यानंतर अशोक कुमार यांनी थेट पोलीस अधिक्षकांनी पत्र लिहून १० दिवसांची सुट्टी मागितली आहे.

Viral News Muzaffarnagar Uttar Pradesh
Viral News Muzaffarnagar Uttar Pradesh (HT)

आरोपींना सळो की पळो करून सोडणाऱ्या पोलीस निरिक्षकाला घरात बायकोनं धारेवर धरल्यामुळं अशोक कुमार यांनी कुटुंबातील समस्या आणि स्थिती लक्षात घेऊन १० दिवसांची सुट्टी एसपींकडे मागितली. त्यानंतर मुजफ्फरनगरच्या एसपींनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालत अशोक कुमार यांना दिलासा दिला आहे. कारण एसपींनी त्यांना १० दिवसांची रजा मंजुर केली असून त्यानंतर आता ते होळी साजरी करण्यासाठी बायकोसह सासरी जाऊ शकणार आहेत.

IPL_Entry_Point