मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Railway Engine Theft : चक्क बोगदा खोदून रेल्वे इंजिन चोरलं; धक्कादायक घटनेनंतर तिघांना अटक

Railway Engine Theft : चक्क बोगदा खोदून रेल्वे इंजिन चोरलं; धक्कादायक घटनेनंतर तिघांना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 26, 2022 09:54 AM IST

Railway Engine Theft : चोरट्यांनी रेल्वेचं इंजिन चोरण्यासाठी भलामोठा बोगदा तयार केला होता. बोगद्यातून चोरटे रात्री आले आणि रेल्वेचं इंजिन गायब केलं.

Railway Engine Theft In Bihar
Railway Engine Theft In Bihar (HT_PRINT)

Railway Engine Theft In Bihar : अत्यंत चालाखीनं आणि शिताफीनं चोरट्यांनी रेल्वेचं इंजिन चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी चक्क बोगदा खोदून रेल्वे इंजिन चोरून नेल्याची घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून रेल्वे इंजिनचे सुटे भाग जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या बरौनीपासून मुजफ्फरपूरपर्यंत चोरट्यांनी जमिनीत बोगदा तयार केला. त्यानंतर चोरट्यांनी रेल्वे डेपोत उभी असलेल्या एका रेल्वेचं इंजिन गायब केलं. त्यानंतर चोरट्यांनी रेल्वे इंजिनचे सुटे भाग पोत्यात भरून भंगाराच्या दुकानात नेऊन विकले. त्यानंतर ही धक्कादायक घटना रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसानी तात्काळ कारवाई करत तिन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचं इंजिन दुरुस्तीसाठी आणण्यात आलं होतं. चोरट्यांनी मोठा बोगदा तयार करत इंजिनाचे वेगवेगळे भाग करत इंजिन चोरून नेलं. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाच्या तक्रारीवरून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून १३ पोती लोखंड जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग