मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  North Korea : 'मुलांची नाव बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा'; हुकुमशाह किम जोंग उनंचा अजब फतवा

North Korea : 'मुलांची नाव बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा'; हुकुमशाह किम जोंग उनंचा अजब फतवा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 08:37 AM IST

Kim Jong Un : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन त्याच्या अनेक कृतींमुळे जगभरात चर्चिला जातो. काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरिया आणि जपान वरून क्षेपणास्त्र डागल्याने किम जोंग उनंने सर्वांच्या झोपा उडवल्या होत्या. आता देशातील नागरिकांमध्ये देशप्रेम जगावण्यासाठी त्याने अजब फतवा काढला आहे. या नव्या फतव्याची जगभरात चर्चा होत आहे.

  हुकुमशाह किम जोंग उनं
हुकुमशाह किम जोंग उनं (AP)

North Korea Dictator : उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन राष्ट्रांमधील वैर जगात प्रसिद्ध आहेत. दोन्ही देशात विविध कारणावरून तणाव हा कायम असतो. कधी एकमेकांवर क्षेपणास्त्र डागल्याने तर कधी युद्धसारवामुळे हे दोन्ही देश कायम आमनेसामने असतात. भविष्यात होणारे युद्ध बघता उत्तर कोरियाच्या हुकूमशाह किम जोंग उनने देशातील नागरिकांसाठी एक अजब फतवा काढला आहे. या फतव्याची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. जनतेत देशप्रेम वाढवण्यासाठी त्याने देशात यापुढे जन्मणाऱ्या बाळकांची नावे ही बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवण्याचे आदेश दिले असून देशप्रेम वाढीसाठी हा निर्णय घेतला असल्याने त्याने सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील भविष्यातील युद्धजन्य परिस्थिती बघता देशातील मुलांमध्ये देशप्रेम वाढावे. तसेच लष्करात तरुण पिढी दाखल व्हावी यासाठी लहाणपणापासून मुलांच्या मनामध्ये देशप्रेम जागृत व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांची नावे ही बॉम्ब, बंदुक आणि क्षेपणास्त्रांवर आधारित असावी, असे उन याने म्हटले आहे. अशी नावे ठेवल्यास मुलांमध्ये जहाल देशभक्तीची भावना निर्माण होईल. त्यामुळे आता उत्तर कोरियामध्ये लहान मुलांची नावे बदलून चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) आणि उई सॉंग (उपग्रह) यांसारखीनावे ठेवली जाणार आहे. या आदेशामुळे उत्तर कोरियातील जनता कंटाळली आहे. नावे बदलण्या संदर्भात गेल्या महिन्यात नोटीस देण्यात आली होती.

नावे बदलण्यासंदर्भात जनतेवर दबाव आणला जात आहे. मात्र, नागरिक या आदेशाला दबक्या आवाजात विरोध करत आहेत. या पूर्वी उत्तर कोरियामध्ये ११ दिवस हसण्यावर बंदी घालण्यात आली होती. उत्तर कोरियाचे माजी हुकूमशाह किम जोंग-टू यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर आता मुलांची नावे बदलण्याचा अजीब फतवा काढण्यात आला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या