Mumbai Local Viral Video: मुंबईतील भाईंदर पूर्व ते पश्चिमेला जोडणाऱ्या फुटओव्हर ब्रिजवरुन एका तरुणाने रेल्वेच्या रुळावर उडी मारल्याची घटना उघडकीस आली. मात्र, त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची महिती आहे. तसेच त्याच्या नातेवाईकांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण फुटओव्हर ब्रिजवरु चढताना दिसतो. त्यानंतर तो रेल्वे रुळावर उडी मारतो. पुलावरुन खाली उडी मारल्याने त्या तरुणाला जबर मार लागल्याचे दिसत आहे. यानंतर आरपीएफच्या जवानांनी आणि रेल्वे प्रवाशांनी त्या तरुणाकडे धाव घेत त्याला रेल्वे रुळापासून बाजूला केले. या घटनेनंतर आरपीएफच्या जवानांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हा संपूर्ण प्रकार भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या फूट ओव्हरब्रिज येथील असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेसंदर्भात पश्चिम रेल्वेने ट्विट केले आहे.तसेच नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. "आरपीएफ कर्मचाऱ्यांनी भाईंदर येथील एका तरुणाने फुटओव्हर ब्रिजवरून थेट रुळांवर उडी मारली. त्याला मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे प्रत्येकाला रेल्वे रुळवर अतिक्रमण करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करते," असे पश्चिम रेल्वेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने धावू लागली. या मालगाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता. उतारामुळे ही मालगाडी ड्रायव्हरशिवाय धावत गेल्याची सांगितले आहे. ही मालगाडी जवळपास ८४ किलोमीटरपर्यंत ड्रायव्हरशिवाय धावत राहिली. यामुळे रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.