massive fire broke out in MP mantralaya : भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. गेट क्रमांक ५ आणि ६ मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. लोक घाबरून इमारतीतून बाहेर पळून आले.
अग्निशमन दलाला तत्काळ या घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आग एवढी भीषण होती की, अनेक महत्त्वाची कागदपत्रे यात जळून खाक झालीची माहिती आहे. तसेच आगीत ५ ते ७ लोक अडकल्याची देखील माहिती आहे. त्यात मोठ्या प्रमाणात वारे वाहत असून आग त्यामुळे आणखी भडकली होती. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
सीएम मोहन यादव म्हणाले, "वल्लभ भवनच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मी सीएसला या घटनेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. "आग आटोक्यात आणण्यात असली असून यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये, यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत.
खासदारांचे सचिवालय वल्लभ भवनमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय येथे पाचव्या मजल्यावर आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये भोपाळमधील सातपुडा भवनात भीषण आग लागली होती ज्यात अनेक महत्त्वाच्या सरकारी फायली जळून खाक झाल्या होत्या.
वल्लभ भवनला आग लागल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आगीच्या कारणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास ही आग लागली. मंत्रालयाच्या गेट क्रमांक ५ आणि ६ समोर स्वच्छता करत होते. त्यानंतर दोन गेट्समध्ये बांधलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर निघताना दिसला. त्यावर, या घटनेची माहिती तात्काळ महापालिकेच्या फाइल नियंत्रण कक्षाला देण्यात आली. सुमारे १५ मिनिटांनंतर अग्निशमन दलाचे जवान आले आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली.