मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  US report on aliens :एलियन्स आहेत महा शक्तिशाली; पृथ्वीलाही दिली आहे भेट? अमेरिकेनं सादर केला UFO अहवाल

US report on aliens :एलियन्स आहेत महा शक्तिशाली; पृथ्वीलाही दिली आहे भेट? अमेरिकेनं सादर केला UFO अहवाल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 09, 2024 10:45 AM IST

US report on aliens : अमेरिकेने परग्रहीवासी म्हणजेच एलियन्स (UFO) वर अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात एलियन्सकडे असे अलौकिक तंत्रज्ञान असून ते शक्तिशाली आहेत. ही शक्ति, तंत्रज्ञात पृथ्वीवरील मानवांकडे देखील नाही असे या अहवालात म्हटले आहे.

एलियन्स आहेट महा शक्तिशाली; पृथ्वीलाही दिली आहे भेट
एलियन्स आहेट महा शक्तिशाली; पृथ्वीलाही दिली आहे भेट

US report on aliens : पृथ्वीवर एलियन्स आले आहेत का? एलियन्सकडे महासत्ता आहे आणि ते आपल्या पृथ्वीवर प्रवास करून त्यांच्या जगात परत आले आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत अमेरिकेने नुकताच अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (यूएफओ) बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. खरं तर, एलियन्सकडे असे अलौकिक तंत्रज्ञान अर्थात महासत्ता असू शकते, जे कदाचित पृथ्वीवरील मानवांकडे नसेल, असा अंदाज बांधला जात आहे.

Sheikh Salla Dargah : कसबा पेठेतील बहुचर्चित शेख सल्ला दर्ग्यावर रात्री कारवाईच्या अफवेने तणाव! पोलिसांचा चोख बंदोबस्त

यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे मुख्यालय पेंटागॉनच्या एका अहवालात म्हटले आहे की द्वितीय विश्वयुद्ध संपल्यापासून अमेरिका सरकारच्या तपासणीमध्ये एलियन्सच्या अलौकिक तंत्रज्ञानाचा कोणताही पुरावा आढळला नाही. त्यात म्हटले आहे की बहुतेक निरीक्षण केलेल्या सामान्य वस्तू आणि घटना चुकीच्या पद्धतीने ओळखल्या गेल्या आहेत. अहवालात म्हटले आहे की आकाशात दिसणाऱ्या काही घटना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. त्यात आधुनिक आणि अलौकिक तंत्रज्ञानाचा काहीही सहभाग नाही.

Pune Mhada Lottery : पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ४,७७७ घरांसाठी सोडत जाहीर, असा करा अर्ज?

शुक्रवारी जारी केलेला अहवाल पेंटागॉनच्या २०२२ च्या घोषणेवर आधारित आहे. त्या वर्षी अमेरिकेने ऑल-डोमेन अनोमली रिझोल्यूशन ऑफिस (AARO) ची स्थापना केली. ही संस्था आकाशात अनोळखी उडणाऱ्या वस्तू (UFOs) आणि हवा, समुद्र, अंतराळ आणि जमिनीतील इतर घटनांचा अभ्यास करते. पेंटागॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे की एलियन्सने पृथ्वीला भेट दिली आहे. त्यांच्या जहाजाचे क्रॅश लँडिंग पृथ्वीवर झाले आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा AARO ला सापडला नाही. ARRO ने १९४५ पासून "अनआयडेंटिफाइड एनोमॉलस फेनोमेना" (UAP) शी संबंधित सरकारच्या ऐतिहासिक रेकॉर्डचा तपशील देणारा अहवाल यूएस काँग्रेसला सादर केला आहे.

nirav modi : तुरुंगात असलेल्या नीरव मोदीला लंडन कोर्टाचा दणका! ६६ कोटी भरण्याचे आदेश; दुबईतील कंपनीचा होणार लिलाव

अहवालाच्या सारांशात असे म्हटले आहे की, एएआरओला कोणताही पुरावा सापडला नाही की पृथ्वीवर कोणतेही परग्रहांवरील बाह्य तंत्रज्ञान वापरले गेले होते, अहवालात पुढे म्हटले आहे की, अनेक UAP अहवाल निराकरण न झालेले किंवा अज्ञात राहिले असले तरी, AARO चा विश्वास आहे की जर अधिक आणि चांगल्या दर्जाचा डेटा उपलब्ध झाला तर, यापैकी बहुतेक प्रकरणे नियमित वस्तू किंवा घटना म्हणून ओळखली जातील आणि निराकरण केले जाऊ शकले असते." अहवालात म्हटले आहे की १९४५ पासून सरकारने अनेक बदलांसाठी पैसा खर्च केला आहे. या अंतर्गत, UAPs उड्डाण सुरक्षेसाठी धोकादायक आहेत की नाही किंवा इतर देशांनी अमेरिकेपेक्षा मोठी तांत्रिक झेप घेतली आहे का, हे जाणून घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, पृथ्वी व्यतिरिक्त परग्रहावर एलियन्सचे अस्तित्व आहे ही एक कथा आहे. सरकार किंवा सरकारी गुप्त संस्थेने इतर जगातून "असंख्य अंतराळयान आणि एलियन्सचे अलौकिक जैविक अवशेष" मिळवले आहेत. तसेच एलियन्सचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे अनेक कार्यक्रम आखण्यात आले आहे. यावर अनेकांचा विश्वास असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, आजपर्यंत असा कोणताही पुरावा सापडला नाही की ज्यामुळे असे म्हणता येईल की कोणतेही बाह्य तंत्रज्ञान बाहेरील जगातून आले आहे.

IPL_Entry_Point