मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रेमीयुगुलाने एकमेकांच्या मिठ्ठीत संपवले जीवन, आता दोघांचा पुतळा बनवून लावले लग्न; काय आहे प्रकरण?

प्रेमीयुगुलाने एकमेकांच्या मिठ्ठीत संपवले जीवन, आता दोघांचा पुतळा बनवून लावले लग्न; काय आहे प्रकरण?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 19, 2023 05:09 PM IST

Married statue of lover couple : प्रेमाला होणाऱ्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. आता घरच्यांनी त्यांचे पुतळे बनवून लग्न लावले आहे. ही घटना गुजरातमध्ये घडली आहे.

पुतळ्यांचे लग्न
पुतळ्यांचे लग्न

समाजात मोठे बदल झाले तरी अजूनही काही कुटूंबात प्रेमविवाहास विरोध केला जातो. देशभरातून अशी प्रकरणे समोर येत आहेत. गुजरातमधील तापी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एक प्रेमी युगुलाचा पुतळा बनवून लोक श्रद्धांजली वाहत आहेत व त्यांना प्रेमाचे आदर्श उदाहरण म्हणत आहेत. लोक त्यांच्या मूर्तीवर फुले व हार अर्पण करत आहेत. जेव्हा या दोघांनी लग्नाची परवानगी मागितली तेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला गेला. 

ट्रेंडिंग न्यूज

दोघांच्या पुतळ्याचे केले लग्न -

जेव्हा हे जिंवत होते तेव्हा कुटूंबाने त्यांना लग्नासाठी परवानगी दिली नाही. मृताचे नातेवाईक कैलाश रामभाई पाडवी यांनी म्हटले की, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मूर्ती बनवली गेली. प्रेमी युगुलाचा विवाह झाला नाही मात्र दोन पुतळ्याचे लग्न लावण्यात आले. ६ महिन्यापूर्वी दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते. 

दोघांनी एकमेकांना मिठ्ठी मारून गळफास घेतला होता. दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळून आले होते. ६ महिन्यानंतर कुटूबीयांनी समजले की, त्यांचे प्रेम पवित्र होते. त्यानंतर दोघांचा पुतळा बनवून लग्न लावण्यात आले.  मृत गणेश आपली प्रेयसी रंजनाशी विवाह करणार होता. मात्र त्याच्या घरच्यांना हे मंजूर नव्हते. त्यांनी लग्नास विरोध केल्यानेतर दोघे घरातून निघून गेले होते. काही वेळाने त्यांचे मृतदेह झाडाला लडकलेले आढळून आले. 

गणेशच्या एका नातेवाईकाने सांगितले की, आदिवासी परंपरेनुसार विवाह करण्यात आला. पुतळा बनवून वरात काढण्यात आली व विवाह करण्यात आला. पुतळ्यांची रिती-रिवाजांप्रमाणे लग्न लावले. मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, गणेश त्यांचा लांबचा नातेवाईक होता.

IPL_Entry_Point

विभाग