मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माणसाने कापला बकरा अन् बकऱ्याच्या डोळ्याने घेतला माणसाचा बळी, विचित्र घटनेची सर्वत्र चर्चा

माणसाने कापला बकरा अन् बकऱ्याच्या डोळ्याने घेतला माणसाचा बळी, विचित्र घटनेची सर्वत्र चर्चा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 04, 2023 05:58 PM IST

viral news : एका व्यक्तीने नवस फेडण्यासाठी आधी बकऱ्याचा बळी दिला व नंतर बकऱ्याच्या डोळ्याने माणसाचा मृत्यू झाल्याचीविचित्र घटना घडली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

छत्तीसगडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने नवस फेडण्यासाठी आधी बकऱ्याचा बळी दिला व नंतर बकऱ्याच्या डोळ्याने माणसाचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. छत्तीसगडमधील एका ५० वर्षीय व्यक्तीने आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर बकऱ्याचा बळी दिला. त्यानंतर त्याने बकऱ्याचे मांस शिजवून गावकऱ्यांना जेवण दिले. हो व्यक्ती गावकऱ्यांसोबत जेवायला बसला व त्यानेबकरीचा शिजलेला एक डोळा उचलला आणि तो खायला सुरुवात केली. मात्र हा डोळा त्याच्या घशात अडकला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

ही घटना छत्तीसगड राज्यातील सूरजपूरजवळच्या मदनपूर गावातील आहे. या गावातील रहिवासी ५०वर्षीय बागर साय रविवारी प्रसिद्ध खोपा धाम पोहोचला होता. त्याच्याबरोबर काही गावकरीही होते. खोपा धाममध्ये त्याने कधीकाळी नवस बोलला होता. आपले नवस पूर्ण झाल्यानंतर तो बकऱ्याचा बळी देण्यासाठी येथे आला होता. येथे पूजा केल्यानंतर त्याने बकऱ्याचा बळी दिला व आपल्या साथीदारांच्या मदतीने बकऱ्याचे मांस शिजवून जेवण बनवले. मटणाच्या भाजीतून बकऱ्याचा डोळा काढून बागर खाऊ लागला. त्याच्या गळ्यात बकरीचा डोळा अडकला. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टराने सांगितले की, त्याच्या घशात काहीतरी अडकले आहे. श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला.

 

रुग्णालयात सायच्या मृत्यूनंतर याची सूचना त्याच्या कुटूंबाला देण्यात आली. घटनेवेळी तेथे उपस्थित असणाऱ्या त्याच्या साथीदाराने सांगितले की, बकऱ्याचा डोळा घशात अडकल्याने त्याला त्रास जाणवू लागला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

IPL_Entry_Point