मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka election 2023 : कर्नाटक निवडणुकीची जाहिरात काँग्रेसच्या अंगलट, ‘करप्शन रेट कार्ड’वरून आयोगाने मागितले उत्तर

Karnataka election 2023 : कर्नाटक निवडणुकीची जाहिरात काँग्रेसच्या अंगलट, ‘करप्शन रेट कार्ड’वरून आयोगाने मागितले उत्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 06, 2023 11:27 PM IST

Karnatakaelection 2023 : काँग्रेसच्या एका एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी कर्नाटक काँग्रेसचे डीके शिवकुमार, सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठण्यात आली आहे.

Karnataka election 2023
Karnataka election 2023

निवडणूक आयोगाने भाजपच्या विरुद्ध वृत्तपत्रात प्रकाशित 'भ्रष्टाचार रेट कार्ड'  जाहिरातीवरून  कर्नाटक काँग्रेसला नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आरोप सिद्ध करण्यासाठी रविवारी (७ मे) सायंकाळी सात वाजेपर्यंत पुरावे सादर करावेत. भारतीय जनता पक्षाकडून दाखल तक्रारीनंतर नोटीस जारी करण्यात आली. 

ट्रेंडिंग न्यूज

आदर्श आचार संहिता, जनप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींचा हवाला देत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, असे दिसून येत आहे की, काँग्रेसने जाहिरात प्रसिद्ध करून आदर्श संहितेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. कर्नाटकमध्ये १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने २०१९ ते २०२३ दरम्यान राज्यातील भ्रष्टाचाराची यादी जाहिरात रुपात प्रसिद्ध केली होती. काँग्रेसने भाजप सरकारला 'ट्रबल इंजन' संबोधले आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचला आहे. या दरम्यान काँग्रेसच्या एका एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी कर्नाटक काँग्रेसचे डीके शिवकुमार, सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठण्यात आली आहे. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून निवडणूक आयोगाने काँग्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवडणूक आयोगाने काँग्रेसला रविवारी ७ मे रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितलं आहे. आचारसंहितेच्या तरतुदी २ भाग १ नुसार, निवडणूक प्रचारादरम्यान, विरोधी पक्षाची धोरणे आणि समस्यांबद्दल बोलता येतं. परंतु कोणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, ज्याचा जनतेशी काहीही संबंध नाही, याबद्दल बोलता येत नाही. म्हणजे पुष्टी नसलेल्या आणि निराधार आरोपांवर काहीही बोलणे, किंवा कृत्य करणं, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरतं.

IPL_Entry_Point

विभाग