मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jharkhand Train Accident: एका अफवेमुळं भयानक घडलं; जामतारामध्ये भरधाव रेल्वेनं १२ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू

Jharkhand Train Accident: एका अफवेमुळं भयानक घडलं; जामतारामध्ये भरधाव रेल्वेनं १२ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 28, 2024 10:15 PM IST

Jamtara Train Accident : जामतारा येथे झालेल्या रेल्वे अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मदत व बचावकार्य सुरू आहे.

jamtara train accident
jamtara train accident

Train Accident in Jharkhand : झारखंड राज्यातील जामतारा येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. रेल्वेने १२ जणांना चिरडले त्यातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. हा अपघात करमाटांडजवळ कालाझरिया येथे झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जामतारा आणि विद्यासागर रेल्वे स्थानकादरम्यान एका एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. यानंतर ट्रेनमध्ये खळबळ माजली होती. आगीची माहिती मिळताच रेल्वेमधील प्रवाशी घाईघाईने रेल्वेतून बाहेर पडत असताना त्यांना दुसऱ्या रुळावरून भरधाव वेगाने येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने चिरडले. दुसऱ्या रुळावरून येणारी ट्रेन प्रवाशाना न दिसल्यामुळे ट्रेन जवळ येताच प्रवाशांचा पळापळ झाली. त्यात काही प्रवासी ट्रकवरच पडले. त्याना अक्षरश: कापतच रेल्वे पुढे गेली.

दुसरीकडे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे की, चेन ओढल्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली होती. त्यानंतर काही लोक रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरुन येणाऱ्या रेल्वेने प्रवाशांना चिरडले. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे.  मृतांचा नेमका आकडा अद्याप समोर आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

 सांगितले जात आहे की, बंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस डाउन लाईनमध्ये थांबवण्यात आली होती. यावेळी अनेक प्रवासी रेल्वेतून खाली उतरले होते. मात्र त्याचवेळी दुसऱ्या लाईनवरून आलेल्या ट्रेनने त्यांना धडक दिली.

जामतारा एसडीएम अनंत कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रेल्वेकडून लवकरच हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाईल. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर समजेल.

IPL_Entry_Point