मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : आयपीएस अधिकाऱ्याचा लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल; धक्कादायक प्रकारानं राजकीय वादंग

Viral Video : आयपीएस अधिकाऱ्याचा लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल; धक्कादायक प्रकारानं राजकीय वादंग

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 13, 2023 12:48 PM IST

IPS Officer Viral Video : आयपीएस अधिकाऱ्यानं व्यापाऱ्याला तब्बल २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

IPS Officer Anirudh Singh Viral Video
IPS Officer Anirudh Singh Viral Video (HT)

IPS Officer Anirudh Singh Viral Video : भ्रष्टाचारावरून तपास यंत्रणांकडून देशभरात छापेमारी सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील एका आयपीएस अधिकाऱ्यानं व्यापाऱ्याला तब्बल २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनिरुद्ध सिंह असं आरोपी आयपीएस अधिकाऱ्याचं नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणावरून सपा आणि भाजपात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ ग्रामीण एसपी पदावर असलेल्या अनिरुद्ध सिंह यांचा लाच मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या प्रकरणाला गांभीर्यानं घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. त्यानंतर या प्रकरणावर मेरठ पोलिसांनी संबंधित व्हिडिओ दोन वर्ष जुना असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय आयपीएस अधिकारी अनिरुद्ध सिंह याची चौकशी सुरू करण्यात आल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील वरिष्ठ पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतल्याचं वृत्त आहे.

अखिलेश यांचा योगींवर निशाणा...

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आयपीएस अधिकाऱ्यानं लाच मागितल्याचा ३६ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यानंतर या प्रकरणावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत म्हटलं की, आयपीएस अधिकाऱ्यानं लाच मागितल्याच्या प्रकरणात भाजपा सरकार त्यांच्यावर काही कारवाई करेल की प्रकरण दाबलं जाईल?, भ्रष्टाचाराविरोधात कारवाईचे दावे करणाऱ्या भाजपा सरकारचा फोलपणा यूपीतील जनता पाहत असल्याचं सांगत अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीका केली आहे.

IPL_Entry_Point