दिल्ली : भारतीय नौदलाचा एक भाग बनण्याची एक उत्तम संधी आली आहे. नौदलाने अग्निवीर भरती अंतर्गत तब्बल १ हजार ३६५ पदे भरणार आहेत. यामुळे नौदलासारख्या प्रतिष्ठित क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्यांना ही सुवर्ण संधी आहे. या साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय नौदलात सामील होण्याची सुवर्णसंधी आली आहे. जे उमेदवार भारतीय नौदलाचा भाग होण्याची वाट पाहत होते ते आता अग्निवीर भरती अंतर्गत नौदलासारख्या प्रतिष्ठित क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. या भरतीसाठी २९ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अग्निवीर भरती अंतर्गत निश्चित वार्षिक वाढीसह दरमहा ३०,००० चे पॅकेज दिले जाणार आहे. या सोबतच विशेष भत्ताही दिला जाणार आहे.
नौदलाने जरी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय नौदलात १ हजार ३६५ पदे भरायची आहेत. या पदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. १५ जून पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान, काहीवेळा तांत्रिक अडचणींमुळे, शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करण्यात अडचण येऊ शकते, यामुळे इच्छुकांनी तातडीने अर्ज भरण्यास सुरुवात करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय नौदल अग्निवीर भर्ती २०२३ अंतर्गत उमेदवारांसाठी २९ मे २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर १५ जून २०२३ पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
भारतीय नौदल अग्निवीर भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे काही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. ज्यात गणित आणि भौतिकशास्त्रासह १० आणि १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या विषयांपैकी किमान एक विषय (रसायन/जीवशास्त्र/संगणक विज्ञान) एक विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या