गुजरातमध्ये ३४१ प्राथमिक शाळा अशा आहेत ज्या एकात खोलीतून चालवल्या जात आहेत तसेच डिसेंबर २०२३ पर्यंत शिक्षा विभागात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या १४०० जागा रिक्त आहेत. याची माहिती गुजरात सरकारने विधानसभेत दिली आहे. ही सर्व माहिती गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर डिंडोर यांनी एका लिखित पत्राच्या माध्यमातून दिली.
शिक्षण मंत्री कुबेर डिंडोर यांनी सांगितले की, एकच वर्ग असण्याचे कारण विद्यार्थ्यांची कमी संख्या आणि नवीन वर्गाच्या बांधकामासाठी जमीनचा अभाव आहे. त्याचबरोबर त्यांनी आश्वासन दिले की, या शाळांसाठी लवकरच नवीन वर्ग बनवले जातील. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ७८१ पदे भरली असून अजूनही १४५९ पदे खाली आहेत.
आमदार किरित पटेल यांनी आरोप केला की, बीजेपी सरकारच्या काळात गुजरातमधील शिक्षणाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. भाजप सरकार केवळ पब्लिसिटी करणे आणि गुजरातला मॉडल स्टेट दाखवण्यातच चांगले आहे. मात्र वास्तव याहून वेगळे आहे. परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २०२३ नुसार गुजरातमधील प्राथमिक विद्यालयांत शिकणाऱ्या २५ टक्के मुलांनी व्यवस्थित गुजरातीही येत नाही. तर ४७ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही.
डिंडोर यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत ६५,००० स्मार्ट क्लास बनवण्यात आले आहे व अजून ४३,००० स्मार्ट क्लास बनवण्याचे काम सुरू आहे. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी २०२३-२४ मध्ये एकूण २२,३४९ विद्या सहायक आणि ज्ञान सहायक (शिक्षक सेवक) नियुक्त केले आहेत.
संबंधित बातम्या