मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  INDIA आघाडीतून आणखी एक पक्ष बाहेर, माजी मुख्यमंत्र्यांचा स्वबळाचा नारा

INDIA आघाडीतून आणखी एक पक्ष बाहेर, माजी मुख्यमंत्र्यांचा स्वबळाचा नारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 15, 2024 03:51 PM IST

India Alliance : ममता बॅनर्जी यांच्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनीही लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

 Farooq Abdullah
 Farooq Abdullah

Lok Sabha Election 2024 : जसे-जसे लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतून एक-एक पक्ष बाहेर पडत आहेत. केजरीवाल व ममता बॅनर्जी यांच्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि  नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले की, त्यांचा पक्ष स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पत्रकारांनी जागावाटपाबाबत प्रश्न विचारल्यानंतर ज्येष्ठ नेते अब्दुल्ला यांनी म्हटले की, जागा वाटपाबाबत मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, नॅशनल कॉन्फ्रन्स स्वबळावर निवडणूक लढणार आहे. यावर कोणताही संभ्रम नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकाचवेळी होण्याची चिन्हे आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नीतीश कुमार यांनी एनडीएत प्रवेश केल्यापासून इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जेडीयूनंतर आरएलडी पक्षही आघाडीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे ममता बनर्जी यांनीही एकला चलो चा नारा दिला आहे. आम आदमी पार्टीनेही जागावाटपात नमते न घेता ताठर भूमिका घेतली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा असून तेथेही समाजवादी पार्टीने काँग्रेससोबत आघाडी केलेली नाही. सपा ने काँग्रेससाठी ११ जागा सोडल्या आहेत. नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी एकत्र आलेले २८ पक्ष एक एक करून बाहेर पडत आहेत.

IPL_Entry_Point