मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: सुट्टे पैसे नसल्याचे कारण देणाऱ्यांसाठी भीकाऱ्याने शोधला जबरदस्त उपाय, पाहून सगळेच हैराण!

Viral Video: सुट्टे पैसे नसल्याचे कारण देणाऱ्यांसाठी भीकाऱ्याने शोधला जबरदस्त उपाय, पाहून सगळेच हैराण!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 28, 2024 11:42 AM IST

Guwahati Beggar Video: गुवाहाटी येथील एका भिकाऱ्याची भीक मागण्याची पद्धत पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

iगुवाहाटी येथील एका भीकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
iगुवाहाटी येथील एका भीकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Guwahati Digital Beggar Viral Video: ट्रॅफिक सिग्नलवर किंवा चौकाचौकात असहाय्य लोक भीक मागताना दिसतात. त्यांची अवस्थापाहून अनेक लोक त्यांना जेवण किंवा पैशांची मदत करतात. तर, काही जण सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत त्यांना भीक टाळतात. अशा लोकांसाठी एका भिकाऱ्याने उपाय शोधला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संबंधित भिकारी चक्क क्यूआरकोड घेऊन भीक मागत आहे. भीक मागण्याची पद्धत पाहून लोक त्या व्यक्तीला डिजिटल भिकारी म्हणू लागले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

हा व्हिडिओ काँग्रेस नेते गौरव सोमाणी यांनी एक्सवर शेअर केला. हा व्हिडिओ गुवाहाटीमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत एक भिकारी क्यूआर कोड वापरून लोकांकडून भीक मागतोय. तंत्रज्ञानाला खरोखर मर्यादा नाहीत. त्यात सामाजिक-आर्थिक स्थितीतील अडथळे दूर करण्याची क्षमताही आहे, असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहून शकतो की, एक व्यक्ती क्यूआर कोड घेऊन रस्त्यावर भीक मागत आहे, जेणेकरून कोणताही व्यक्ती सुट्टे पैसे नाही, असे बोलून भीक देणे टाळू नये. या डिजिटल भिकाऱ्याकडे फोन पे, पेटीएम आणि गुगल पे सारख्या डिजिटल पेमेंट सुविधा आहेत. भिकारी एका कारजवळ आणि त्यांच्याकडे मदतीसाठी विनंती करतो. कारमधील व्यक्ती क्यूआर कोडस्कॅन करून भिकाऱ्याला १० रुपये पाठवतो.

IPL_Entry_Point

विभाग