मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malaad suicide news : मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळं अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

Malaad suicide news : मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळं अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 28, 2024 11:10 AM IST

Malad Girl commits suicide due to pain of menstruation : मुंबईत मालाड येथे एका अल्पवयीन मुलीला मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

 मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलींन उचललं टोकाच पाऊल
मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलींन उचललं टोकाच पाऊल

Malad Girl commits suicide due to pain of menstruation : मासिक पाळीत अनेक महिलांना त्रास होत असतो. मूड स्विंग्स आणि पोटदुखी, अंगदुखी हा प्रामुख्याने त्रास होत असतो. मात्र, हाच त्रास सहन न झाल्याने मुंबईतील मालाड येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खबळल उडाली असून मुलीच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

Suicide Prevention: थांबा, आत्महत्येचा विचार करत असाल तर या गोष्टी आधी करा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मालवणी येथील खारोडी परिसरात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. मृत मुलगी ही तिच्या आई वडिलांसोबत राहत होती. मंगळवारी घरी कुणी नसतांना तिने घरातील लोखंडी सळीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ही घटना तिच्या पालकांसह शेजाऱ्यांना लक्षात आली.

त्यांनी तिला तातडीने स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कांदिवली येथील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारांपूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील घटनास्थळी आले.

mumbai goa highway accident : जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटल्यामुळं मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांनी जबाब दिला. मृत मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला प्रचंड त्रास झाला. यामुळे ती तणावात तसेच नैराश्यात होती. हा त्रास असह्य झाल्याने तिने गळफास लावून आत्महत्या केली असावी असे तिच्या पालकांनी दिलेल्या जबाबात सांगण्यात आले आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पुण्यात छेडछाडीला कंटाळून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यात  कात्रज परिसरात एका मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची  घडना घडली आहे. सोशल मिडीयावर तसेच प्रत्यक्षात सातत्याने संपर्क साधून तिच्या इच्छेविरुद्ध तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याने घाबरलेल्या मुलीने हे पाऊल उचलले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. अजिंक्य आवटे (रा. भोसरी) आणि सुजल खुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. पिडीत मुलगी ही शाळेला आणि क्लासला जात येत असताना आरोपी तिचा पाठलाग करून तिची छेड काढत होते.

IPL_Entry_Point