मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cyclone Mocha: 'मोचा' चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकणार; बंगालच्या उपसागरात वादळाचे केंद्र

Cyclone Mocha: 'मोचा' चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकणार; बंगालच्या उपसागरात वादळाचे केंद्र

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 02, 2023 07:31 AM IST

Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात 'मोचा' चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीला येत्या ५ ते ११ मे दरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Cyclone Mocha
Cyclone Mocha

Wether Updates: वाढते उन, अवकाळी पाऊस यानंतर आता देशात चक्रीवादळ येणार आहे. बंगालच्या उपसागरात या चाकरीवादळाची निर्मिती होणार आहे. येत्या ५ ते ११ मे दरम्यान, हे चक्रीवादळ तयार होऊन ते बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकणार आहे. भारतातही या चक्रीवादळाचे परिणाम होणार आहे. या वादळाला 'मोचा' हे नाव देण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढणार; पुढच्या २४ तासांत राज्यात गारपीटीचा इशारा

दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होणार असल्याने हे चक्रीवादळ तयार होणार आहे. भारतीय हवामान विभागाने देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होऊ शकते. हे चक्रीवादळ येत्या ५ ते ११ मे दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचे नामकरण हे मोचा करण्यात यएल आहे. ११ ते १५ मे दरम्यान, हे वादळ बांग्लादेशला धडकणार आहे. या चक्रीवादळा संदर्भात अमेरिकन ग्लोबल फोरकास्ट यंत्रणेनं अंदाज वर्तवला होता.

१२ ते १४ मे रोजी मध्यरात्रीनंतर हे चक्रीवादळ म्यानमारच्या राखीव राज्य आणि बांग्लादेशच्या चट्टोग्राम किनारपट्टीवर धडकू शकते. या चक्रीवादळाचा वेग ताशी १५० ते १८० किमी राहू शकतो. भारताच्या ओदिशा किनारपट्टीला देखील हे वादळ धडकू शकते. या वादळाचे 'मोचा' असे नामकरण यमनने केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग