मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढणार; पुढच्या २४ तासांत राज्यात गारपीटीचा इशारा

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढणार; पुढच्या २४ तासांत राज्यात गारपीटीचा इशारा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 02, 2023 06:32 AM IST

Weather Update Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाने झोडपले आहे. पुढच्या २४ तासांत राज्याच्या अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Unseasonal rains in maharashtra
Unseasonal rains in maharashtra

पुणे : राज्याला अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील अवकाळीचा फेरा आजही कायम राहणार आहे. पुढच्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई पुणे एक्स्प्रेस द बर्निंग कार ! बोरघाटात मोठी वाहतूककोंडी वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगा

राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट आणखी काही दिवस राज्यावर घोंगावणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासाह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्यमहाराष्ट्रात आज मराठवाड्यात दोन दिवस तर विदर्भातील पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी सोसायट्याचा वारा, वीजांचा कडकाडाट आणि गारा पडण्याची शक्यता आहे.

Pandharpur : विठुरायाचरणी महिला भक्ताकडून दोन किलोचे सोन्याचे दागिने अर्पण, या आधीही १ कोटी ८० लाखाचे दान

जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ५०० हून अधिक बकऱ्या दगवल्या. त्यात तीन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यांसह गारपीट झाल्यामुळे शेतीपिकांसह फळबागांचे मोहटे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यापूर्वी संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यासह जळगाव आणि चोपड्यात तुफानी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे परिसरातील हवामानाचा अंदाज

पुणे आणि आसपासच्या परिसरात गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा देखील शक्यता आहे. उद्या सुद्धा ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पण गारा मात्र पडणार नाही. त्यापुढील पाच दिवस आकाश शक्यतोवर निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point