मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Video : ‘बकरी ईद मे बचेंगे तो...’, खरगेंच्या विधानानं खळबळ; मुस्लिमांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप

Video : ‘बकरी ईद मे बचेंगे तो...’, खरगेंच्या विधानानं खळबळ; मुस्लिमांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 13, 2022 11:41 AM IST

Mallikarjun Kharge : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार मल्लिकार्जून खरगे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे.

Mallikarjun Kharge Statement
Mallikarjun Kharge Statement (HT)

Mallikarjun Kharge Statement : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच मल्लिकार्जून खरगे हे वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते देशातील विविध भागांमध्ये जाऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भोपाळमध्ये आले असता त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना खरगे म्हणाले की, 'आमच्याकडे एक म्हण आहे, बकरी ईदमध्ये वाचू तर मोहर्रममध्ये नाचू, आधी माझी निवडणूक तर संपू द्या.', असं वक्तव्य केल्यानं आता भाजपनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मुस्लिमांची धार्मिक भावना दुखावणारं हे वाक्य असल्याचं सांगत भाजप नेत्यांनी खरगेंना धारेवर धरलं आहे.

खरगेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मोहर्रम हा उत्सवाचा नव्हे तर दुखवट्याचा महिना असतो, त्यामुळं खरगेंनी केलेल्या वक्तव्यामुळं जगभरातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचं सांगत पूनावालांना खरगेंवर टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कॉंग्रेसला आस्तित्त्व टिकवणं कठीण झाल्याची टीका केली आहे.

राजकीय दरोडे घालून भाजप लोकशाहीची लूट करतोय- खरगे

मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, भाजपनं मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील सरकार पाडलं. महाराष्ट्रातही काळ्या पैशांचा वापर करत सत्ता मिळवली. हे कृत्य लोकशाहीविरोधात असून आम्ही याविरोधात लढणार आहोत. भाजप राजकीय दरोडे घालून लोकशाहीची लूट करत असल्याची टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर केली आहे.

IPL_Entry_Point