मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hijab Row : हिजाब प्रकरणात न्यायाधीशांच्या मतभिन्नतेमुळं सुनावणी लांबली; खटला विस्तारीत खंडपीठाकडे

Hijab Row : हिजाब प्रकरणात न्यायाधीशांच्या मतभिन्नतेमुळं सुनावणी लांबली; खटला विस्तारीत खंडपीठाकडे

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 13, 2022 11:13 AM IST

Hijab Controversy : शाळा आणि कॉलेजमध्ये कर्नाटक सरकारनं घातलेल्या बंदीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे.

sc on hijab controversy in karnataka
sc on hijab controversy in karnataka (HT_PRINT)

hijab controversy in karnataka : कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संकुलात हिजाबवर घातलेल्या बंदीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी विस्तारीत खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे. सकाळी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया या न्यायाधीशांच्या बेंचनं यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद ऐकून घेतले. परंतु दोन्ही न्यायाधीशांनी या प्रकरणात वेगवेगळी मतं नोंदवल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी विस्तारीत खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी तीन न्यायाधीशांचं खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहे.

सुप्रीम कोर्टात सुनावणी करताना न्या. हेमंत गुप्ता म्हणाले की, याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात ११ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं हिजाब बंदीविरोधातील याचिका फेटाळून लावण्यात याव्यात, याशिवाय कर्नाटक हायकोर्टानं दिलेला निकाल योग्य असल्याचं मत न्या. गुप्ता यांनी व्यक्त केलं. तर न्या. सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय दिला. न्या. गुप्ता यांच्या निकालाला न्या. धुलिया यांनी असहमती दर्शवल्यानं हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे.

कर्नाटकमध्ये काही महिन्यांपूर्वी शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम मुलींनी घातलेल्या हिजाबवरून मोठं राजकीय वादंग पेटलं होतं. त्यानंतर कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संकुलात हिजाब घालून येण्यास बंदी घातली होती. त्यानंतर हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टात गेलं. कर्नाटक हायकोर्टानंही सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्यानं याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

IPL_Entry_Point