मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Aandolan : चंद्रकांत पाटलांनी मराठा संघटनांत फूट पाडली?, कथित व्हायरल ऑडिओमुळं खळबळ

Maratha Aandolan : चंद्रकांत पाटलांनी मराठा संघटनांत फूट पाडली?, कथित व्हायरल ऑडिओमुळं खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 13, 2022 10:36 AM IST

Maratha Aandolan : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख असलेली कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Audio Clip About Maratha Aandolan
Viral Audio Clip About Maratha Aandolan (HT)

Viral Audio Clip : सध्या सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन व्यक्तींमधील हे संभाषण व्हायरल होत असून त्यात चंद्रकांत पाटलांनी मराठा क्रांती मोर्चातील नेत्यांना फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु चंद्रकांत पाटलांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' व्हायरल ऑडिओची पुष्टी करत नाही.

मराठा आंदोलन फोडण्यासाठी झाला आर्थिक व्यवहार?

व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं गेलं आहे. मात्र चंद्रकांत पाटलांनी या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आरोप फेटाळून लावत कुणी तरी आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचल्याचं म्हटलं आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काही व्यक्तींमध्ये मोर्चात फूट पाडण्यासाठी पैशांची देवाण-घेवाण झाल्याचंही सांगण्यात येतंय. परंतु ते नेते कोण होते, त्यांचं नाव अजून समजू शकलेलं नाही. त्यामुळं आता या व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी होण्याची शक्यता आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा संघटनांनी अनेक जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले होते. औरंगाबाद आणि परळी या आंदोलनांचं केंद्र होतं. याशिवाय अहमदनगरमधील कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेनंतर ही आंदोलनं सुरू झाली होती. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा संघटनांमध्ये फूट पाडण्याचा आरोप व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point