मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना ‘ते’ वक्तव्य भोवणार, शिंदे गटाकडून तक्रार दाखल; अटकेची मागणी

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना ‘ते’ वक्तव्य भोवणार, शिंदे गटाकडून तक्रार दाखल; अटकेची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 12, 2022 09:44 AM IST

Bhaskar Jadhav Controversial Statement : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात शिंदे गटानं तक्रार दाखल केली आहे.

Bhaskar Jadhav Controversial Statement
Bhaskar Jadhav Controversial Statement (HT)

Bhaskar Jadhav Controversial Statement : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता शिंदे गटाकडून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळं आता शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी महाप्रबोधन यात्रेदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांनी गोंदिया शहर पोलिसांत भास्कर जाधवांविरोधात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात, गोंदिया हा जिल्हा आदिवासीबहुल असल्यानं नागरिकांमध्ये त्यांच्याविरोधात मोठा रोष आहे. त्यामुळं त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते शिवहरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. याशिवाय भास्कर जाधवांनी आदिवासी बांधवांचाही अपमान केला असून त्यांना अटक न झाल्यास आंदोलनाचाही इशारा शिवहरे यांनी दिल्यानंतर आता भास्कर जाधवांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान ठाकरे गटानं सुरू केलेल्या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानं त्यावर भाजपनं आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात गोंदियात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं आता शिंदे आण ठाकरे गटातील राजकीय वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point