मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत एक बकरा १० वर्षापासून बनलाय CRPF चा ‘मित्र’, नावही आहे खुपच युनिक

नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत एक बकरा १० वर्षापासून बनलाय CRPF चा ‘मित्र’, नावही आहे खुपच युनिक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 04, 2024 10:46 PM IST

CRPF Batallion Friend : छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील एका बटालियनमध्ये एक बकरा खूपच खास आहे. बटालियनच्या प्रत्येक मोहिमेत याचा सहभाग असतो. त्याचे नाव चांमुडा असे असून यामागेही एक विलक्षण कहाणी आहे.

viral news
viral news

छत्तीसगडमध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची बटालियन १५० नक्षलवाद्यांशी लढत आहेत. सुकमा जिल्ह्यात सुरू असलेल्या या लढाईच्या तणावात दिलासा देत आहे, सीआरपीएफचा एक खास दोस्त. या दोस्ताबाबत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून एक बकरा आहे. त्याचे नाव आहे चामुंडा. तो जवळपास गेल्या १० वर्षापासून बटालियनच्या सोबत राहतो.  बटालियन कुठेही गेली तरी ते या बकऱ्याला सोबत घेऊन जाते. अशा प्रकार हा बकरा पोस्ट टू पोस्ट सीआरपीएफ जवानांसोबत फिरत असते.

ट्रेंडिंग न्यूज

गुरुवारी नक्षलवाद्यांसोबत चकमकीनंतर चामुंडा तेथे झाडाची पाने खाताना तसेच कॅम्प परिसरात फिरताना दिसून आला. चामुंडा बकऱ्याची सीआरपीएफ बटालियनशी जोडले जाण्याची कहाणीही खूपच खास आहे. २०२४ मध्ये बटालियन सुकमा जिल्ह्यातील कांकेरलांका गावात तैनात होती. त्यावेळी जवानांना हा बकरा मिळाला होता. त्यावेळी हे बकरे केवळ ४५ दिवसांचे होते व आजारी होते. याच्या मालकाने याला सीआरपीएफच्या कॅम्प परिसरात सोडले होते. त्याला चालताही येत नव्हते. त्यानंतर बटालियनच्या लोकांची याचा सांभाळ केला व याला आजारातून बरे केले. आता तो कॅम्पमधील कुटूंबाचा एक सदस्य बनला आहे. जर तो आजारी पडला तर जवान त्याच्या औषधासाठी रायपूरपर्यंत जात असतात. 

बटालियनच्या एका जवानाने याच्या नामकरणाची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही एखाद्या मिशनवर जातो किंवा परतत असतो तेव्हा आम्ही चामुंडा माता की जय असा नारा देत असतो. त्यांनी सांगितले की, त्यादिवशी आम्ही चामुंडा मातेचे नाव घेतले व बकऱ्याला मलेरियाची गोळी दिली. ही टॅबलेट खाताच बकरा एकदम ठीक झाला व आमच्या कॅम्पमध्ये राहू लागला. या बटालियनचे राजस्थानमधील अजमेर येथील चामुंडा देवी मंदिराशी खुपच जवळचे नाते आहे. जेव्हा बटालियन आपल्या विशेष वाहनाने एक कॅम्पमधून दुसऱ्या कॅम्पकडे जात असते तेव्हा हे बकरेही त्यांच्या खास वाहनांतून प्रवास करत असते.

IPL_Entry_Point