मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचं समन्स, रविवारी चौकशी होणार

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचं समन्स, रविवारी चौकशी होणार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 14, 2023 06:11 PM IST

Arvind Kejriwal CBI Enquiry : दिल्लीतील अबकारी धोरणाच्या चौकशीसाठी सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

Arvind Kejriwal CBI Enquiry
Arvind Kejriwal CBI Enquiry (PTI)

Arvind Kejriwal CBI Enquiry : दिल्लीतील अबकारी धोरणात गैरव्यवहाराचा आरोप करत तपास यंत्रणांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. याबाबत सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवलं असून येत्या रविवारी म्हणजेच १६ एप्रिलला केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळं आता यावरून भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने नवीन अबकारी धोरणास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या धोरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तपास यंत्रणांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली जाणार आहे. याबाबत सीबीआयने त्यांना समन्स पाठवलं असून येत्या रविवारी त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळं आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

कोरोना महामारीमुळं देशभरातील अनेक राज्यांच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं होतं. त्यामुळं दिल्लीची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आप सरकारने दिल्लीत नवीन अबकारी धोरण आणलं होतं. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. सुरुवातीला तपास यंत्रणांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. आता सीबीआय या प्रकरणात थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार असल्यामुळं यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point