मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India vs Canada : कॅनडा कसा झाला मिनी पंजाब? किती आहे शीख आणि हिंदूंची संख्या?

India vs Canada : कॅनडा कसा झाला मिनी पंजाब? किती आहे शीख आणि हिंदूंची संख्या?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 26, 2023 01:44 PM IST

India vs Canada update : कॅनडामध्ये सर्वाधिक भारतीय राहतात. तेथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १९ लोक निवडून आले आहेत. त्यापैकी १७ हे शीख असून ते ट्रूडो सरकारच्या लिब्रल पक्षाचे आहेत.

India vs Canada update :
India vs Canada update :

India vs Canada : क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेला कॅनडा आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश भारत यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासूंन कमालीचे ताणले आहेत. खलिस्तानवाद्यांबद्दल कायम सहानुभूती असणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला. यामुळे दोन्ही देशातील संबंध हे विकोपाला गेले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : पुणे पालिकेसमोर प्रक्षोभक भाषण केल्याने समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटेवर गुन्हा

हरदीपसिंग निज्जर हा खलिस्तानचा दहशतवाडी मूळचा पंजाब येथील जालंधर येथील रहिवासी आहे. १९९० च्या सुमारास कॅनडामध्ये त्याने स्थलांतर केले. निज्जर हा खलिस्तान या दहशतवादी संघटनेच्या नेता झाला. निज्जर हे कॅनडा येथील गुरू नानक शीख गुरुद्वाराचे अध्यक्षही होते. याच ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली. निजजरने खलिस्तानवाद्यांची वकिली देखील केली. खलिस्तानची मागणी अनेक दशकांपासून होत असून ती भारतात जवळपास निष्क्रिय आहे. तर दुसरीकडे, कॅनडातील शीख स्थलांतरित समुदायामध्ये सध्या हा मुद्दा चांगलाच प्रभावी झाला आहे.

कॅनडात जास्त हिंदू किंवा शीख आहेत का?

२०२१ च्या जनगणनेनुसार कॅनडाची लोकसंख्या ही ३.७० कोटी आहे. त्यापैकी १६ लाख म्हणजे सुमारे चार टक्के भारतीय वंशाचे आहेत. कॅनडात शिखांची लोकसंख्या अंदाजे ७ लाख ७० हजार एवढी आहे. कॅनडातील शीख लोकसंख्या गेल्या २० वर्षांत दुप्पट झाली आहे. यातील बहुतांश नागरिक हे पंजाबमधून उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी स्थलांतरित झाले आहेत. पंजाबनंतर जगातील सर्वाधिक शीख हे कॅनडात राहतात.

Pune News : गणपतीसाठी केलेल्या विद्युत रोषणाईनं घेतला तरुणाचा जीव; शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्यू

बहुतेक स्थलांतरित शीख खलिस्तानचे समर्थक

कॅनडात मोठ्या संख्येने शीख राहतात जे खलिस्तान चळवळीचे समर्थक आहेत. कॅनडाच्या सरकारमध्येही शिख धर्मियांचा प्रभाव आहे. २०१५ मध्ये जस्टिन ट्रुडो पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी शीख समुदायातील चार लोकांना आपल्या सरकारमध्ये मंत्री केले. १९८१ मध्ये, कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ४.७ टक्के नागरिक अल्पसंख्याक होते. एका अहवालानुसार २०३५ पर्यंत हिंदू, मुस्लिम आणि शीख अल्पसंख्याकांची लोकसंख्या कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या ३३टक्के होईल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कॅनडामधील शीख समुदायाच्या प्रगतीमागे गुरुद्वारा आणि त्यांचे नेटवर्किंग हे एक महत्वाचे कारण आहे. या साठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला जातो. हा पैसा निवडणूक प्रचारासाठी खर्च केला जातो.

Pune Crime: अग्निवीर योजनेतून लष्करात नोकरी देण्याच्या आमिषाने १७ जणांना १३ लाखांचा गंडा

कॅनडाच्या निवडणुकीत शिखांची भूमिका

कॅनडाच्या ३८८ खासदारांपैकी १८ शीख आहेत. यापैकी आठ जागांवर शिखांचे पूर्ण नियंत्रण आहे आणि इतर १५ जागांवर ते निर्णायक लढतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाला या समाजाला नाराज करायचे नाही.

शिख पहिल्यांदा कॅनडात कधी गेले?

असे म्हटले जाते की १८९७ मध्ये राणी व्हिक्टोरियाने हीरक महोत्सवी सोहळ्यात सामील होण्यासाठी ब्रिटिश भारतीय सैनिकांच्या तुकडीला लंडनला बोलावले होते. त्यानंतर भारतीय सैन्याच्या घोडदळ तुकडीच्या सैनिकांचा एक गट राणीसोबत ब्रिटिश कोलंबियाला येथे गेला. त्या सैनिकांमध्ये कॅनडात स्थायिक झालेले रिसेलदार मेजर केसर सिंग होते. कॅनडामध्ये स्थायिक होणारे ते पहिले शीख ​​असल्याचे मानले जाते.

केसर सिंह यांनी इतर काही सैनिकांसह ब्रिटिश कोलंबियामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. काही सैनिक परत आल्यावर त्यांनी पंजाबमध्ये या गोष्टी सांगितल्या आणि तेव्हापासून पंजाबमधील लोक ब्रिटिश कोलंबियामध्ये स्थायिक होण्याची प्रक्रिया सुरू झाली. यातील ९० टक्के शिख धर्मीय होते.

 

IPL_Entry_Point

विभाग