मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs RCB Highlights : विराट कोहलीची आरसीबी आयपीएलमधून बाहेर, संजूसेना जेतेपदापासून २ पावलं दूर

RR vs RCB Highlights : विराट कोहलीची आरसीबी आयपीएलमधून बाहेर, संजूसेना जेतेपदापासून २ पावलं दूर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 22, 2024 11:38 PM IST

RR vs RCB Highlights : एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ विकेट्स राखून पराभव केला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ या विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे. आता त्यांचा सामना २४ मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

RR vs RCB Highlights
RR vs RCB Highlights (AP)

आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना आज(२२ मे) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने आरसीबीचा धुव्वा उडवला. यासह विराट कोहलीची आरसीबी आयपीएल २०२४ मधून बाहेर पडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आता राजस्थानचा संघ विजेतेपदापासून २ विजय दूर आहे. त्यांचा पुढील सामना क्वालिफायर-२ असेल, ज्यामध्ये त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) होईल. हा सामना २४ मे रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, जिथे त्यांचा सामना २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होईल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थानने ६ गडी गमावून सामना जिंकला. संघाकडून यशस्वी जैस्वालने ३० चेंडूत ४५ धावांची शानदार खेळी केली.

पण एकवेळ राजस्थानच्या ८६ धावांवर ३ पडल्या होत्या. यानंतर ११२ धावांवर चौथी विकेट गेली. त्यानंतर दबावाखाली दिसणाऱ्या राजस्थानला रियान परागने वाचवले. परागने २६ चेंडूत ३६ धावा केल्या.

शेवटी, शिमरॉन हेटमायरने १३ चेंडूत २६ धावांची खेळी केली आणि रोव्हमन पॉवेलने ८ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने २ बळी घेतले.

आरसीबीचा डाव

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १७२ धावा केल्या होत्या. आरसीबीकडून रजत पाटीदारने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर विराट कोहलीने ३३ आणि महिपाल लोमरने ३२ धावा केल्या.

कोहलीने २४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारला. कॅमेरून ग्रीनने २७ धावांची खेळी केली. रजत पाटीदारने २२ चेंडूत ३४ धावा केल्या. दिनेश कार्तिक ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्वप्नील सिंग ९ धावा करून नाबाद राहिला.

राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४