मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पत्नीला 'भूत-पिशाच्च' म्हणणं ही क्रूरता नाही; हायकोर्ट असे का म्हणाले?

पत्नीला 'भूत-पिशाच्च' म्हणणं ही क्रूरता नाही; हायकोर्ट असे का म्हणाले?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 30, 2024 03:51 PM IST

Court News : कोर्टाने म्हटले की, अयशस्वी वैवाहिक संबंधात पती-पत्नी दोघेही एकमेकांविरुद्ध अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. त्यामुळे असे आरोप क्रूरतेच्या व्याख्येत बसत नाहीत.

पत्नीला 'भूत-पिशाच' म्हणणं क्रूरता नाही
पत्नीला 'भूत-पिशाच' म्हणणं क्रूरता नाही

पाटणा उच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात म्हटले की, पतीने आपल्या पत्नीला भूत-पिशाच म्हणणे क्रूरतेच्या श्रेणीत येत नाही. त्याचबरोबर हायकोर्टाने कनिष्ट न्यायालयाने दोषी ठरवलेल्या पतीची शिक्षाही रद्द करत त्याला मोठा दिलासा दिला आहे. जस्टिस बिबेक चौधरी यांच्या एकल सदस्यीय खंडपीठाने पती-पत्नीचे भांडण व हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले की,वैवाहिक आयुष्यात व विशेष करून अयशस्वी वैवाहिक संबंधात अशा घटना होत असतात. अशावेळी पती-पत्नी दोघेही एकमेकांविरुद्ध अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. त्यामुळे असे आरोप क्रूरतेच्या व्याख्येत बसत नाहीत.

त्याचबरोबर जस्टिस बिबेक चौधरी यांनी आयपीसी कलम ४९८ ए आणि हुंडाविरोधी अधिनियम १९६१ चे कलम ४ नुसार एका पतीला कनिष्ठ न्यायालयाने सुनावण्यात आलेली शिक्षा रद्द केली. नालंदा जिल्ह्यातील सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांनी याप्रकरणी पतीला दोषी ठरवले होते. त्यानंतर नालंदामधील सीजेएम कोर्टानेही हा निकाल कायम ठेवला होते. याविरुद्ध पीडित पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हायकोर्टने या प्रकरणात प्रतिवादी पत्नीचे हे आरोपही फेटाळून लावले की, तिने पतीच्या त्रासाबाबत आपल्या वडिलांना चिठ्ठी लिहून कळवले होते. याचे पुरावे मागितल्यावर पत्नी ते पुरावे सादर करू शकली नाही. कोर्टाने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही फेटाळला. तिने आरोप केला होता की, पतीने हुंड्यात कार मागितली होती. कोर्टाने म्हटले की, आरोपी पती व त्याच्या कुटूंबावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, भारतीय दंड संहिता ४९८ ए नुसार दाखल खटला दोघांत वैयक्तिक भांडण, द्वेष आणि मतभेदाचा परिणाम होता. कोर्टाने तो फेटाळून लावला आहे.

IPL_Entry_Point

विभाग