मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Paper Leak Case : पेपर फुटल्यानंतर खाजगी कोचिंग क्लासवर हातोडा; जेसीबीच्या सहाय्यानं इमारत जमीनदोस्त

Paper Leak Case : पेपर फुटल्यानंतर खाजगी कोचिंग क्लासवर हातोडा; जेसीबीच्या सहाय्यानं इमारत जमीनदोस्त

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 09, 2023 12:20 PM IST

Paper Leak Case : पदवी परिक्षेतील पेपर फुटल्याच्या घटनेनंतर आता सरकारनं एका खाजगी कोचिंग क्लासच्या बिल्डिंगवर हातोडा चालवला आहे.

Paper Leak Case In Jaipur Rajasthan
Paper Leak Case In Jaipur Rajasthan (HT)

Paper Leak Case In Jaipur Rajasthan : पदवी परिक्षेतील पेपर लीक केल्याप्रकरणी एका खाजगी क्लासचालकाच्या इमारतीवर हातोडा चालवत सरकारकडून कठोर कारवाई करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानातील जयपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून गेल्या राजस्थानात पेपर लीक होण्याची ही तिसरी मोठी घटना उघडकीस आल्यानंतर यासाठी प्रशासनानं एका खाजगी क्लासचालकाला जबाबदार धरत कारवाई सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, जयपुरमधील अनेक कॉलेजेसमध्ये पदवीच्या परिक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश जारी केले होते. प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी करून एका खाजगी क्लासचालकानंच पेपर फोडल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह जयपुरमधील खाजगी क्लासचालकाचं ऑफिस आणि इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळं आता या कारवाईमुळं पेपरफुटीच्या घटनांना गांभीर्यानं घेतलं जाणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोचिंग क्लास चालकानं बेकायदेशीरित्या इमारतीचं आणि ऑफिसचं बांधकाम केलं होतं, त्यामुळंच हे अतिक्रमण आता हटवण्यात आल्याची माहिती जयपूर विकास प्राधिकरणानं दिली आहे. पेपरफुटीतील आरोपींना सोडून सरकार भलत्याच लोकांवर कारवाई करत आहे. पेपरफुटीची घटना आणि पाडकामाचा काय संबंध आहे, असा सवाल खाजगी क्लासचालकांच्या संघटनेनं दिला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा प्रायव्हेट क्लासचालकांनी दिला आहे.

IPL_Entry_Point