मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bihar Politics : नितीश कुमार भाजपला देणार धक्का? राजकारण तापलं, सोनियांशी संपर्क

Bihar Politics : नितीश कुमार भाजपला देणार धक्का? राजकारण तापलं, सोनियांशी संपर्क

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 07, 2022 11:21 PM IST

जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापलं आहे. जेडीयू-भाजप युती तुटून बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीश कुमार भाजपला देणार धक्का?
नितीश कुमार भाजपला देणार धक्का?

पाटणा - आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारच्या राजकारणात हालचाली गतिमान झाल्या आहेत. मागील चार कार्यक्रमात मुख्यमंत्री नीतीश कुमार सामील न झाल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (nitish kuma) यांनी  मंगळवारी जेडीयू आमदारांची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर पक्षाच्या खासदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे राजदमध्येही हालचाली वाढल्या आहेत. मंगळवारी आरजेडीनेही राबड़ी देवी यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. जेडीयू आणि भाजपमध्ये तणाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. 

जेडीयू -काँग्रेस युतीची शक्यता -

जेडीयू आणि भाजपची युती तुटू शकते आणि त्यानंतर जेडीयू काँग्रेससोबत जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी जेडीयूच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली असून, पक्ष भाजपसोबतची युती तोडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सोनिया गांधींशी नीतीश कुमार यांचा संपर्क?
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. दरम्यान याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. सध्या काँग्रेसही केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. एकीकडे सोनिया गांधी व राहुल गांधींच्या विरोधात ईडीची कार्रवाईतर दुसरीकडे महागाईविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल सुरू आहे. अशात नितीश कुमार यांनी भाजपला धक्का दिल्यास केंद्र सरकारच्या अडचणी वाढू शकतात. 

माजी केंद्रीय मंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. जेडीयूने गेल्या महिन्यात आरसीपी सिंह यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आरसीपी सिंह यांनी मोदींच्या मंत्रिमंडळाचा निरोप घेतला. तेव्हापासून आरसीपी सिंह पक्षावर नाराज होते. आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयू आणि भाजपमधील मतभेदही समोर आले आहेत.

 

IPL_Entry_Point