मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Canada : खळबळ! खालिस्तानवाद्यांनी कॅनडातील राम मंदिरावर लिहिल्या भारताविरोधी घोषणा

Canada : खळबळ! खालिस्तानवाद्यांनी कॅनडातील राम मंदिरावर लिहिल्या भारताविरोधी घोषणा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 15, 2023 09:45 AM IST

anti India slogans written on ram temple in Canada : कॅनडा येथील मिसिसॉगा येथील राम मंदिरावर भारताविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. दोन आठवड्यापूर्वी येथील गौरी शंकर मंदिरावर देखील अशाच घोषणा लिहिल्या होत्या. या घटनेच्या भारताने निषेध केला आहे.

खालिस्तानवाद्यांनी कॅनडातील राममंदिरावर लिहिल्या भारताविरोधी घोषणा
खालिस्तानवाद्यांनी कॅनडातील राममंदिरावर लिहिल्या भारताविरोधी घोषणा

anti India slogans written on ram temple in Canada : कॅनडा येथील मिसिसॉगा येथील राम मंदिरावर भारता विरोधी घोषणा लिहिण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यापूर्वी येथील गौरी शंकर मंदिरावर देखील अशाच घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. टोरंटो येथील भारतीय दुतावासाने या घटनेच्या निषेध केला आहे. या सोबतच या घटनेचा तपास करण्यात यावा आणि दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात अलायी आहे. या संदर्भात दूतावासाने ट्विट करत माहिती दिली आहे. भारतीय दूतावासाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मिसिसॉगा येथील राम मंदिरावर भारताविरोधी लिहिल्या घोषणांच्या घटनेची निंदा करत असून या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कॅनडाच्या सरकारकडे केली आहे.''

ट्रेंडिंग न्यूज

भारताविरोधी घोषणा लिहिल्याची ही पहिलीच घटना नाही. या पूर्वी येथील ब्रेम्पटन येथील एका हिंदू मंदिरावर देखील अशाच घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय नागरिकांनी या घटनेचा निषेध केला होता. येथील गौरी शंकर मंदिरात तोडफोड करत भारत विरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्याचे भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

या संदर्भात ट्विट करत लिहिण्यात आले होते की, या घटनेची आम्ही निंदा करत आहोत. ब्रेम्पटन येथील गौरी शंकर मंदिरात भारताविरोधी लिहिलेल्या घोषणांनाचा विरोध करतो. या घटनेमुळे कॅनडा येथे राहणाऱ्या भारतीयांच्या भावना या दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही येथील पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

येथील महापौर पैट्रिक ब्राऊन यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, अशा घटनांना आम्ही देशात स्थान देणार नाही. प्रत्येकाला देशात सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. या पूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये देखील स्वामीनारायण मंदिरात ख़ालिस्तानवाद्यांनी भारता विरोधी घोषणा लिहिल्या होत्या.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग