मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिरे व्यापाऱ्याची ९ वर्षीय मुलगी बनली साध्वी, ऐशो-आरामाचे आयुष्य त्याग करून घेतली दीक्षा

हिरे व्यापाऱ्याची ९ वर्षीय मुलगी बनली साध्वी, ऐशो-आरामाचे आयुष्य त्याग करून घेतली दीक्षा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 20, 2023 06:43 PM IST

Nine year girl become monk : हिरे व्यापाऱ्याची ९ वर्षाची मुलगी साध्वी बनली आहे. तिने ऐशो आरामाचे आयुष्य त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

देवांशी संघवी
देवांशी संघवी

गुजरातमधील सूरत येथील एका हीरा व्यापाऱ्याच्या ९ वर्षीय मुलीने संन्यासी बनण्याची निर्णय घेतला. सांगितले जात आहे की, सूरतमध्ये ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत हिरे व्यापारी संघवी मोहन भाई यांच्या मुलीने दीक्षा घेतली आहे. इतकेच नाही तर ही मुलगी पाच भाषांची जाणकार आहे. सूरतचे हीरा व्यापारी संघवी मोहन भाई यांची नात व धनेश-अमी बेन यांच्या ९ वर्षाची मुलीगी देवांशी हिने साध्वीची दीक्षा घेतली आहे. देवांशीचा दीक्षा महोत्सव वेसूमध्ये १४ जानेवारी पासून सुरू झाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

देवांशीचे पिता सूरतमध्ये जवळपास तीन तीन दशकापूर्वी स्थापन केलेल्या डायमंड पॉलिशिंग आणि एक्सपोर्ट फर्म संघवी अँड सन्सचे मालक आहेत. देवांशी आता सर्व भौतिक सुखे व सोयी-सुविधांपासून व ऐशो आरामाच्या जीवनापासून दुरावली आहे. त्यांच्या कुटूंबाचे मित्र नीरव शाह यांनी म्हटले की, देवांशीला बालपणापासूनच आध्यात्मिक जीवनाकडे ओढा होता. तिने अन्य भिक्षुंबरोबर जवळपास ७०० किमीपर्यंत पदयात्रा केली होती व औपचारिकरित्या संन्यासी बनण्यापूर्वी त्यांची जीवनशैली स्वीकारली होती. तिला पाच भाषा बोलता व लिहिता येतात तसेच ती अन्य कौशल्यातही निपूण आहे.

त्यांनी म्हटले की, देवांशीला एका कार्यक्रमात साध्वीची दीक्षा दिली गेली. देवांशीला चार वर्षाची लहान एक बहीणही आहे. देवांशीला बालपणापासून धार्मिक कार्याकडे ओढा होता. तिने कमी वयात तपस्वी जीवनाचे पालन केले होते.

शाह यांनी म्हटले की, देवांशीला दीक्षा देण्यापूर्वी शहरातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी म्हटले की, अशाच प्रकारची मिरवणूक बेल्जियममध्येही काढण्यात आला. जैन समाजातील अनेक हिरे व्यापाऱ्यांचे बेल्जियम सोबत घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग