मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hijab Protest In Iran : हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू; सरकारविरोधात महिला आक्रमक

Hijab Protest In Iran : हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू; सरकारविरोधात महिला आक्रमक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 03:25 PM IST

Hijab Protest In Iran 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून हिजाबच्या सक्तीविरोधात इराणमध्ये महिलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. परंतु आता सरकार आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

Hijab Protest In Iran 2022
Hijab Protest In Iran 2022 (HT)

Hijab Protest In Iran 2022 : इराणमध्ये महिलांनी सुरू केलेलं आंदोलन आणखी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. कारण आता इराणमधील ८० शहरांमध्ये या आंदोलनाचं लोण पोहचलं आहे. त्यामुळं आता सरकारनं आंदोलकांची मुस्कटदाबी करायला सुरुवात केली असून अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळं आता आंदोलक महिला आणखी आक्रमक झाल्या असून त्यांनी अनेक शहरांमध्ये हिजाब आणि केस जाळायला सुरुवात केली आहे. याशिवाय आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात आतापर्यंत ४० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महसा अमिनी या महिलेनं सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घातल्याच्या कारणावरून पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर तिचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता महिलांनी हिजाबविरोधी आंदोलनात मोठ्या संख्येनं भाग घ्यायला सुरुवात केली आहे. कारण आता इराणमधील ३१ प्रांतातल्या ८० पेक्षा अधिक शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.

निवेदकानं हिजाब न घातल्यानं राष्ट्रपतींचा मुलाखतीस नकार

इराणमधील एका वृत्तवाहिनीनं राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखतीसाठी आमंत्रित केलं होतं. परंतु त्यांनी महिला वृत्तनिवेदकाला हिजाब घालण्याची विनंती केली. त्यामुळं न्यूज अँकरनं रईसी यांची मुलाखत घेण्यास नकार दिला. राष्ट्रपती रईसी यांनी घातलेल्या अटींमुळंच महिला न्यूज अँकरला त्यांची मुलाखत घेता आली नाही. त्यामुळं आता इराणमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग