मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  California Firing : डिजेवर थिरकेल्या तरुणाईवर अंदाधुंद गोळीबार; कॅलिफोर्नियात १० ठार, १९ जखमी!

California Firing : डिजेवर थिरकेल्या तरुणाईवर अंदाधुंद गोळीबार; कॅलिफोर्नियात १० ठार, १९ जखमी!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 22, 2023 04:13 PM IST

California Firing : चीनी नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकजण एका पार्टीत जमले होते. त्यावेळी आरोपीनं जमावावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Firing In California America
Firing In California America (HT_PRINT)

Firing In California America : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची संतापजनक घटना समोर आली आहे. चीनी नववर्षाची पार्टी साजरी करत असलेल्या तरुणाईवर कॅलिफोर्नियात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल १९ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळं कॅलिफोर्नियात खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतील विविध शहरांमध्ये गोळीबाराच्या घटना समोर आलेल्या आहे. त्यातच आता कॅलिफोर्नियातही तरुणाईवर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं अमेरिकेतील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, चीनी नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी कॅलिफोर्नियातील मोंटेरी पार्कमध्ये चीनी नागरिकांसह दक्षिण आशियाई लोक जमले होते. त्यावेळी तरुणाईनं डीजेच्या तालावर डान्स सुरू केला. त्यावेळी एका सशस्त्र आरोपीनं तरुणाईच्या गर्दीवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. डीजे सुरू असल्यामुळं गोळीबार सुरू असल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नाही. परंतु पार्कमधील सुरक्षारक्षकांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता आरोपीनं हा हल्ला वर्णद्वेषातून केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाबाबत कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

गोळीबार झाला तेव्हा कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं तरुणांनी गर्दी केलेली होती. त्यामुळं सध्या १० लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलेली असली तरी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या अशाच एका कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पाच लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु आता पुन्हा कॅलिफोर्नियातील गोळीबारात दहा लोकांचा मृत्यू झाल्यामुळं अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point