मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?; मुख्यमंत्र्यांंची जोरदार टोलेबाजी

Eknath Shinde: मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?; मुख्यमंत्र्यांंची जोरदार टोलेबाजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 22, 2022 04:39 PM IST

CM Eknath Shinde : एखादा गुंड पैशाच्या बळावर एखाद्या वार्डात निवडून येऊ शकतो, परंतु केवळ पैशाच्या बळावर संपूर्ण गावात किंवा शहरात निवडून येणं शक्य नसल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट सरपंच निवडीच्या निर्णय कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadnavis - Eknath Shinde
Devendra Fadnavis - Eknath Shinde (HT)

Shinde-Fadnavis Govt : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायलॉगबाजी करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय शिंदे सरकारनं घेतल्यानं त्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनं जोरदार टीका केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ही मागणी जनतेचीच होती, नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक घेण्यासाठी २००६ साली निर्णय घेण्यात आला होता. एखादा गुंड एखाद्या वार्डात पैशाच्या बळावर निवडून येऊ शकतो, परंतु केवळ पैशाच्या बळावर तो संपूर्ण शहरात किंवा गावात निवडून येऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून करायची असेल तर घटनेत बदल करायचा का?, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या आणि विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सरपंचपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेनं आमच्याकडे केली होती, आम्ही त्यांचीच मागणी मान्य केलेली आहे, आमचा अजेंडा आम्ही राबवत नाही, तर जनतेच्या इच्छेनं काम करत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

'देवेंद्रजी और में हू साथ साथ, मेरा नाव है एकनाथ'

विरोधकांवर टीका करताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार डायलॉगबाजी केली आहे. फडणवीसांबद्दल बोलताना 'देवेंद्रजी और में हू साथ साथ, मेरा नाव है एकनाथ' अशा खास शैलीत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान आज विधानसभेत महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक २०२२ ही दोन विधेयकं संपूर्ण बहुमतानं पारित करण्यात आली आहे.

सक्षम नसतो तर करेक्ट कार्यक्रम केला नसता...

राज्यातील विरोक्षी पक्ष मी सक्षम मुख्यमंत्री नसल्याची टीका करत आहे, पण मी जर सक्षम नसतो, तर एवढा मोठा करेक्ट कार्यक्रम केला असता का?, केला की नाही करेक्ट कार्यक्रम? मविआ सरकारच्या काळात ठाकरे हे अजित पवारांचं ऐकत होते म्हणून ते आमचं ऐकत नव्हते, असं म्हणत त्यांनी अजित पवारांसह उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे.

IPL_Entry_Point